Home /News /crime /

चंद्रपूर हादरलं! भरदिवसा हॉटेलमध्ये शिरून बुरखाधारी व्यक्तीनं केला गोळीबार; एक जण जखमी

चंद्रपूर हादरलं! भरदिवसा हॉटेलमध्ये शिरून बुरखाधारी व्यक्तीनं केला गोळीबार; एक जण जखमी

यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

    चंद्रपूर, 12 जुलै: विदर्भातील चंद्रपूर (Chandrapur news), बल्लारपूर (Ballarpur) आणि गडचिरोली (Gadchiroli) या भागांमध्ये सध्या गुन्हेगारीचं प्रमाण वाढतच चाललं आहे. गुन्हेगारांना (Criminals) आता पोलीसांचंही (Police) भय राहीलं नाही आहे. यामुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. आज दुपारी अशीच एक हादरवून सोडणारी घटना चंद्रपूर (Chandrapur crime news) शहरात घडली आहे. एका बुरखाधारी व्यक्तीनं एका हॉटेलमध्ये घुसून गोळीबार (Firing in Chandrapur) केला आहे. यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर शहरातील आझाद बगीचाच्या बाजुला असलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्समधील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. इथे भरदिवसा एका अज्ञात बुरखाधारी व्यक्तीनं गोळीबार केला.  या गोळीबारात आलेवार नावाची व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. हे वाचा - रक्ताचा टिळा लावून केलं प्रेमाचं नाटक; विवाहित तरुणाचे तरुणीवर लैंगिक अत्याचार दरम्यान गोळीबार सुरु असताना नागरिक आपला जीव वाचवण्यासाठी इतरत्र लपून बसले. यात जखमी व्यक्ती एका मोबाईलच्या दुकानात जाऊन लपल्यामुळे थोडक्यात बचावला. मात्र तो व्यक्ती गंभीर जखमी आहे अशी माहिती मिळाली आहे. गोळीबार नक्की कोणी केला याबाबत अजूनही ठोस माहिती मिळू शकली नाही. गोळीबारानंतर आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे मात्र या गंभीर प्रकरणाचा पोलीस सध्या शोध घेत आहे. तसंच आरोपीचा युद्धपातळीवर शोध घेण्यात येत आहे. या सर्व प्रकारामुळे नागरिकांच्या मनात मात्र भीती निर्माण झाली आहे.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Chandrapur, Crime news

    पुढील बातम्या