Home /News /crime /

प्रेमाला नकार दिल्याने तरुणीसह आईची निघृण हत्या, आरोपीनं स्वतःही घेतला गळफास

प्रेमाला नकार दिल्याने तरुणीसह आईची निघृण हत्या, आरोपीनं स्वतःही घेतला गळफास

मूळचा हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी असणारा प्रकाश मोरे हा 26 वर्षीय तरुण कामकाजासाठी पनवेलमध्ये (Panvel) राहत होता. इथे त्याचं एका 19 वर्षीय मुलीबरोबर प्रेमसंबंध निर्माण झाले होते. मात्र त्या मुलीच्या घरून त्यांच्या प्रेमला विरोध होता.

पुढे वाचा ...
नवी मुंबई, 23 फेब्रुवारी : कोरोनाचं संकट, त्यामुळे निर्माण झालेली बिकट आर्थिक परिस्थिती, बेरोजगारी त्याचबरोबर अन्य कारणांनी नैराश्याचं प्रमाण वाढत असून, त्यातून आत्महत्यांचं प्रमाणही वाढत असलेल्या चित्र आहे. सध्याच्या या परिस्थितीत प्रेमप्रकरणाला मुलीच्या घरातून विरोध झाल्याने चिडलेल्या तरुणाने मुलीचा आणि तिच्या आईचा खून करून, नंतर स्वतःही आत्महत्या करण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमप्रकरणातून प्रेयसी आणि तिच्या आईचा खून (Killings of Mother and Daughter) करणाऱ्या प्रकाश मोरे या 26 वर्षीय आरोपीनं (Wanted) हिंगोली (Hingoli) इथं झाडावर गळफास घेत आत्महत्या (Suicide) केली असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांनी (Navi Mumbai Police) दिली. ‘मिड डे’ने दिलेल्या वृत्तानुसार, मूळचा हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी असणारा प्रकाश मोरे हा 26 वर्षीय तरुण कामकाजासाठी पनवेलमध्ये (Panvel) राहत होता. इथे त्याचं एका 19 वर्षीय मुलीबरोबर प्रेमसंबंध निर्माण झाले होते. मात्र त्या मुलीच्या घरून त्यांच्या प्रेमला विरोध होता. मोरे हा विधुर (Widower) होता. त्याचं आधी लग्न झालं होतं. मात्र काही वर्षापूर्वी त्याच्या पत्नीचं निधन झालं होतं. त्यामुळे मुलीच्या घरच्यांचा मोरेसोबतच्या तिच्या प्रेमसंबधांना विरोध होता. या विरोधामुळे चिडलेल्या प्रकाश मोरे याने 19 फेब्रुवारी रोजी आपली प्रेयसी आणि तिच्या आईवर चाकूने हल्ला (Stabbed) केला. त्यात त्या दोघींचा मृत्यू झाला.

(वाचा - मोठा निर्णय: अठरा महिन्यांच्या मुलीवर बलात्कार करुन हत्या, आरोपीला फाशीची शिक्षा)

हल्ला केल्यानंतर प्रकाश मोरे तिथून पळून गेला. आई आणि मुलीची हत्या प्रकाशनेच केल्याचं निष्पन्न झाल्यानंतर नवी मुंबई पोलिस त्याचा शोध घेत होते, मात्र हल्ला केल्यानंतर आरोपी प्रकाश हिंगोली या मूळ गावी पळून गेला होता. त्याला अटक करण्यासाठी त्याच्या मागावर असलेल्या नवी मुंबई पोलिसांना तो हिंगोलीत असल्याची माहिती मिळाली. मात्र पोलिस त्याच्यापर्यंत पोहोचण्याआधीच आरोपी प्रकाश मोरेने हिंगोलीत रविवारी 21 फेब्रुवारी रोजी झाडाला टांगून गळफास घेत आत्महत्या केली. 'विधुर असलेल्या प्रकाश मोरेने या आधीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. आपली प्रेयसी आणि तिच्या आईचा खून करून पळून गेल्यानंतर आत्महत्या करण्याआधी त्याने फेसबुकवर (Facebook) आत्महत्या करत असल्याबद्दल एक पोस्टही (Post) अपलोड केली होती. तसंच आपल्या आईलाही फोन केला होता', अशी माहिती या प्रकरणाचा तपास करणाऱ्या नवी मुंबईच्या पोलिस अधिकाऱ्यानं दिली आहे.
Published by:Karishma
First published:

Tags: Crime news, Murder, Shocking, Suicide

पुढील बातम्या