Home /News /crime /

शोकांतिका! शेकडो बेवारस प्रेतांवर केले अंत्यसंस्कार, स्वतःच्या मृत्यूनंतरही राहिला बेवारस

शोकांतिका! शेकडो बेवारस प्रेतांवर केले अंत्यसंस्कार, स्वतःच्या मृत्यूनंतरही राहिला बेवारस

बेवारस प्रेतांवर (Dead bodies) अंत्यसंस्कार (final rites) करण्याचं काम करणाऱ्या व्यक्तीचा खून (murder) झाल्यानंतर त्याचा एकही वारस (relative) अंत्यसंस्कारासाठी आला नाही.

    प्रयागराज, 5 सप्टेंबर : बेवारस प्रेतांवर (Dead bodies) अंत्यसंस्कार (final rites) करण्याचं काम करणाऱ्या व्यक्तीचा खून (murder) झाल्यानंतर त्याचा एकही वारस (relative) अंत्यसंस्कारासाठी आला नाही. त्यामुळे त्याच्यावर अंत्यसंस्कार होताना तो देखील बेवारसच राहिला. दारुच्या नशेतील भांडणांनंतर त्याची हत्या झाली, मात्र पाच दिवस होऊनही एकही नातेवाईक पोलिसांना सापडला नाही. असा झाला खून प्रयागराजमध्ये राहणारा संजय उर्फ बिहारी हा शहरातील बेवारस प्रेतांवर अंत्यसंस्कार करत असे. या कामी त्याची पालिका प्रशासनाला मोठी मदत होत होती. आतापर्यंत त्याने 200 पेक्षा जास्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले होते. आठ दिवसांपूर्वी दारूच्या नशेत असताना त्याची ईश्वरचंद्र नावाच्या व्यक्तीशी भांडणं झाली. त्या रात्रीच्या भांडणाचा राग ईश्वरचंद्रने मनात ठेवला. तीन दिवसांनंतर संजयला बेसावध गाठून त्याने त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. संजयच्या डोक्यावर त्रिशूळ आणि दगडाचे घाव आढळून आले. पोलिसांनी मृतदेहाचं पोस्टमार्टेम करून मृतदेह पाच दिवस शवागारात ठेवला होता. मूळचा बिहारमधील असणाऱ्या संजयच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. यासाठी बिहार पोलिसांचीदेखील मदत घेण्यात आली. मात्र तरीही त्याचा काहीच फायदा झाला नाही. संजयच्या एकाही नातलगाचा शोध लागला नाही. त्यामुळे पोलिसांनी अखेर बेवारस म्हणून त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. संजय हा मूळचा बिहारचा रहिवासी होता आणि दीड वर्षांपूर्वी तो प्रयागराजला आला होता. दिवसभर काम करून तो रात्री गंगेच्या घाटावरच राहत असे. हे वाचा - अल्पवयीन मुलीशी अश्लिल चाळे करणाऱ्या पोलिसाला बेदम चोप, पाहा VIDEO ज्या पालिका प्रशासनासाठी तो काम करत होता, त्यातील एकही अधिकारी किंवा कर्मचारी या अंत्यसंस्काराला उपस्थित नव्हता. नियतीचा हा अजब न्याय असल्याची चर्चा प्रयागराज परिसरात सुरु होती. सर्वांच्या मदतीला धावून येणारा संजय अखेरच्या प्रवासात मात्र एकटाच होता. ना कुणी मित्र त्याच्या अंत्यसंस्काराला आला, ना कुणी नातेवाईक किंवा ना कुणी प्रशासकीय अधिकारी. पोलिसांनी ईश्वरचंद्रविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Crime, Murder, Uttar pardesh

    पुढील बातम्या