मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

30 रुपयांची चोरी करणारा आरोपी 31 वर्षांनंतर अटकेत; प्रकरण ऐकून न्यायाधीश म्हणाले...

30 रुपयांची चोरी करणारा आरोपी 31 वर्षांनंतर अटकेत; प्रकरण ऐकून न्यायाधीश म्हणाले...

चोरीचा (Thief) आरोप असलेल्या एका व्यक्तीला 31 वर्षांनंतर न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. 1990 मध्ये एका शेतकऱ्याच्या खिशातून 30 रूपये चोरी (Steal) केल्याचा आरोप असलेल्या आरोपीला अखेर पोलिसांनी पकडलं.

  • Published by:  Kiran Pharate
नवी दिल्ली 15 जुलै : चोरीचा (Thief) आरोप असलेल्या एका व्यक्तीला 31 वर्षांनंतर न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. 1990 मध्ये एका शेतकऱ्याच्या खिशातून 30 रूपये चोरी (Steal) केल्याला आरोपीला पकडण्यात कैथल पोलिसांना (Kaithal Police) 31 वर्षांनंतर यश आलं आहे. पोलिसांनी सुरुवातीला त्याला 1990 मध्येच अटक केली होती आणि त्याच्याकडून चोरीचे पैसेही जप्त करण्यात आले होते. मात्र, डिसेंबर 1990 मध्ये त्याला जामिनावर बाहेर सोडण्यात आलं. यानंतर हरियाणाच्या (Haryana) जिंद जिल्ह्याच्या ध्रोंडी गावात राहाणाऱ्या आरोपी सुभाष चंद याला सप्टेंबर 1996 मध्ये एका स्थानिक न्यायालयानं फरार घोषित केलं. मात्र, आता त्याला न्यायालयात (Court) हजर केलं असं न्यायाधीश म्हणाले, की त्यानं आधीच तुरुंगात शिक्षा भोगलेली आहे, त्यामुळे त्याला मुक्त करण्यात येत आहे. लव्ह, सेक्स आणि..! विवाहित प्रियकरानं गर्लफ्रेंडचा घेतला सूड; आयुष्य उद्धवस्त केसच्या माहितीनुसार, जसवंती गावातील रहिवासी करम सिंहनं 3 डिसेंबर 1990 मध्ये कैथल कस्बे येथील सदर ठाण्यात तक्रार दिली होती. यात म्हटलं होतं, की केओरक गावाजवळील एका बस स्टॅण्डवर उभा असतानाच आरोपी त्यांच्या जवळ आला आणि त्यांच्या खिशातून 30 रूपये चोरी केले. पोलिसांनी ही तक्रार दाखल करून घेतली. 2 वर्षाच्या चिमुरड्याचा सख्ख्या बापाने चिरला गळा; बायकोवरही केले वार कैथल पोलीस अधिक्षक लोकेंद्र सिंह यांनी सांगितलं, की प्रकरणाच्या माहितीनुसार, FIR दाखल झाल्यानंतर एका दिवसातच पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि त्याच्याकडून चोरी केलेले पैसे जप्त करण्यात आले. एका अधिकाऱ्यानं सांगितलं, की या अटकेनंतर सुभाषला तुरुंगात पाठवण्यात आलं. मात्र, दुसऱ्याच दिवशी 4 डिसेंबर 1990 रोजी त्यांना जामिनावर मुक्त करण्यात आलं. मात्र, यानंतर ते कधीच परतले नाहीत आणि 16 स्पटेंबर 1996 मध्ये न्यायालयानं त्याला फरारी घोषित केलं.
First published:

Tags: Crime news, Thief

पुढील बातम्या