आठवीमध्ये शिकणाऱ्या मुलीला घरात खेचत होता नराधम, आवाज ऐकून धावत आले 3 तरुण!

आठवीमध्ये शिकणाऱ्या मुलीला घरात खेचत होता नराधम, आवाज ऐकून धावत आले 3 तरुण!

"मुली सुरक्षित नाहीत हे या घटनेवरून पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून अशा नराधमाना फाशी द्यावी अन्यथा आम्ही कायदा हातात घेवू"

  • Share this:

विजय देसाई, प्रतिनिधी

नालासोपारा, 17 डिसेंबर :  नालासोपारा पूर्वेकडील संतोष भुवन इथं आठवीत शिकणाऱ्या मुलीचं अपहरण करून घरात खेचून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलीने आरडाओरडा केल्याने तीन मुलांनी तिला त्या नराधमाच्या तावडीतून सुटका केली.

संतोष भुवन येथील आठव्या वर्गात शिकणारी मुलगी सकाळी शाळेत जात असताना आरोपी इद्रीस शेख ३९ याने तिच्या तोंडावर कपडा टाकून त्याच्या घरात खेचून नेले आणि जबरदस्ती करून तिला जर माझ्याशी संबंध केले नाहीस तर तुला ठार मारेन, अशी धमकी दिली.

मात्र, पीडित मुलीने आरडाओरडा केल्यानं शेजारीच राहणारे ३ तरुण धावून आले आणि त्यांनी तिची सुटका केली. मुलीची सुटका केल्यानंतर आरोपी इद्रीस शेख याला तुळींज पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

तुळींज पोलिसांनी तत्काळ आरोपी इद्रीस शेख याला ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याने अशाच प्रकरचे गुन्हे केले आहेत कायाचा तपास करीत आहेत.

दरम्यान, आजही आपल्या मुली सुरक्षित नाहीत हे या घटनेवरून पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून अशा नराधमाना फाशी द्यावी अन्यथा आम्ही कायदा हातात घेवू, असं पीडित मुलीच्या वडिलांचं म्हणणं आहे.

अत्याचार करणारा कोणत्याही जाती धर्माचा असो त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे, असं मत भाजप उपाध्यक्ष विनय पांडे यांनी व्यक्त केले आहे.

संतोष भुवन बिलालपाडा परिसरात अनेकजण अमलीपदार्थ सेवन करून धुंद झालेले असतात. त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे अशी मागणी स्थानिक रहिवासी संदीप मिश्रा यांनी केली.

Published by: sachin Salve
First published: December 17, 2019, 6:13 PM IST
Tags: Rape

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading