मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

प्रचंड दारू, मग विष प्राशन, नंतर थेट गळफास, एकाचवेळी 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न, कारण...

प्रचंड दारू, मग विष प्राशन, नंतर थेट गळफास, एकाचवेळी 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न, कारण...

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या 35 वर्षीय इसमाचं नाव रवींद्र कटारे असं आहे. त्याने आत्महत्येचा प्रयत्न नेमका का केला?

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या 35 वर्षीय इसमाचं नाव रवींद्र कटारे असं आहे. त्याने आत्महत्येचा प्रयत्न नेमका का केला?

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या 35 वर्षीय इसमाचं नाव रवींद्र कटारे असं आहे. त्याने आत्महत्येचा प्रयत्न नेमका का केला?

  • Published by:  Chetan Patil

भोपाळ, 14 नोव्हेंबर : आपल्या आयुष्यात असलेल्या कोणत्याही समस्येवर आत्महत्या हा पर्याय नाही. पण तरीही काहीजण नैराश्यात जावून आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतात. मध्यप्रदेशच्या बैतूल येथून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बैतूलमध्ये वास्तव्यास असलेल्या एका 35 वर्षीय इसमाने एकाचवेळी तीनदा आत्महत्या (suicide) करण्याचा टोकाचा प्रयत्न केला. पण कुटुंबातील इतर सदस्यांमुळे त्याचा जीव वाचवण्यात यश आलंय. पण अजूनही त्याची प्रकृती नाजूक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या व्यक्तीने स्वत:ला संपविण्यासाठी आधी प्रचंड दारु प्यायली. त्यानंतर विषारी पदार्थाचं सेवन केलं. तरीही आपला मृत्यू होत नाही म्हणून त्याने थेट गळफास घेतला. या इसमावर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आत्महत्येचं नेमकं कारण काय?

संबंधित घटना ही बैतूल जिल्ह्यातील चिचोली पोलीस ठाणे हद्दीतील पठाखेडा येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या 35 वर्षीय इसमाचं रविंद्र कटारे असं नाव आहे. रविंद्र यांनी आत्महत्येचा प्रयत्न नेमका का केला? असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. दुसरीकडे पोलीसही याबाबतची ठोस माहिती मिळवू शकलेले नाहीत. पोलिसांकडून सध्या तपास सुरु आहे.

हेही वाचा : Rape प्रकरण : मुंबई HC म्हणाले, तिच्या जबाबावर विश्वास ठेवणं कठीण; आरोपीची सुटका

'रवींद्रचा उपचारासही प्रतिसाद नाही'

दरम्यान, जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर अजय महोरे यांनी रवींद्र यांच्या प्रकृतीची माहिती दिली. "रवींद्र बेशुद्ध होईपर्यंत दारू प्यायला होता. त्यानंतर तो शुद्धीवर आला तेव्हा त्याने विषारी पदार्थाचं सेवन केलं. पण तरीही आपला श्वास थांबत नाही म्हणून त्याने थेट गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आम्ही उपचार करुन त्याच्या शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढलं आहे. पण तरीही सध्या त्याची प्रकृती नाजूक आहे. उपचारादरम्यान तो अजिबात सहकार्य करत नव्हता. त्यामुळे उपचारात अडथळा येत होता", अशी माहिती डॉक्टर अजय महोरे यांनी दिलीय.

हेही वाचा : देशासाठी लढण्याचं स्वप्न हवेत विरलं; रणभूमीत जाण्याआधीच कोल्हापुरातील जवानाला मृत्यूनं गाठलं

रविंद्रच्या भावाची प्रतिक्रिया

रवींद्र हा टॅक्सी ड्रायव्हर आहे. त्याच्या स्वत:च्या मालकीची एक टॅक्सी आहे. तो प्रवास करुन शुक्रवारी (13 नोव्हेंबर) सकाळी आपल्या घरी परतला होता. पण त्यानंतर त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली. दरम्यान, रविंद्रचा भाऊ विनोदने या घटनेबाबत माहिती दिली. "रवींद्रचा कदाचित पत्नी सीमासोबत काही क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. त्यातून त्याने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. त्याने नेमका कोणता विषारी पदार्थ खाल्ला त्याची माहिती अद्याप मिळाली नाही. पण त्यानंतर त्याने गळफास घेतला. कुटुंबातील इतर सदस्यांनी त्याला लटकलेल्या अवस्थेत बघितल्यानंतर खाली उतरवलं. मला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मी तातडीने तिथे गेलो. नंतर रवींद्रला रुग्णालयात नेलं", अशी माहिती विनोदने दिली.

First published:

Tags: Madhya pradesh