Home /News /crime /

विवाहित महिलेसोबत अनेक वर्ष होते संबंध, सोबत यायला नकार दिल्यावर प्रियकराने तिच्या घरासमोरच घेतले विष

विवाहित महिलेसोबत अनेक वर्ष होते संबंध, सोबत यायला नकार दिल्यावर प्रियकराने तिच्या घरासमोरच घेतले विष

46 वर्षीय मृताचे नाव साजिद आहे. तो 25 जूनला आपल्या घरातून निघाला होता. मात्र, 29 जूनपर्यंत तो परतलाच नाही.

    मेरठ, 3 जुलै : उत्तरप्रदेशच्या मेरठमध्ये (Meerut UP) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी विवाहित महिलेच्या प्रेमात वेड्या झालेल्या एकाने तिच्या घरासमोर जाऊन विष घेत आत्महत्या (Married Woman Boyfriend Suicide Meerut) केली. यानंतर आणखी एका विचित्र प्रकार घडला. तो म्हणजे पोलिसांना (Police) माहिती देण्याऐवजी कुटुंबीयांनी त्याचा मृतदेह कालव्याच्या काठावर ठेवला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. नेमकं काय घडलं -  46 वर्षीय मृताचे नाव साजिद आहे. तो 25 जूनला आपल्या घरातून निघाला होता. मात्र, 29 जूनपर्यंत तो परतलाच नाही. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी तो गायब झाल्याची तक्रार पोलिसांत दिली. यानंतर पोलिसांना तपासादरम्यान, एका व्यक्तीचा मृतदेह कालव्याच्या किनाऱ्यावर मिळाला. पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले असता मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नाही. त्यानंतर पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली. अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध - मेरठ ग्रामीणचे पोलीस अधीक्षक केशव कुमार यांनी सांगितले की, साजिदचे मेरठ येथील एका महिलेसोबत अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. 25-26 जून रोजी तो या महिलेला भेटण्यासाठी घरून निघाला होता. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेऊन चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. या महिलेने सांगितले की, साजिद 25-26 च्या रात्री तिच्या घरी आला होता. साजिद तिला त्याच्यासोबत जायला सांगत होता. मात्र, तिने विवाहित असल्याचे सांगत साजिदसोबत जाण्यास नकार दिला. यामुळे त्याने तिच्या घरासमोरच विष घेत आत्महत्या केली. यामुळे घाबरलेल्या महिलेने आपल्या दोन्ही भावांना बोलावून त्याला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. मृतदेह पाहून महिलेला काय करावे, काय करू नये, हे समजत नसल्याने साजिदचा मृतदेह कालव्याजवळ ठेवून आले. हेही वाचा - उच्चशिक्षित तरुणीचं जडलं दूधविक्रेत्यावर प्रेम; संसार थाटताच घडला भयानक प्रकार याबाबत साजिदच्या घरच्यांना कळेल, अशी आशा महिलेला आणि तिच्या कुटुंबीयांना होती. मात्र, साजिद 29 तारखेपर्यंत परत न आल्याने कुटुंबीयांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. दरम्यान, महिलेने साजिदच्या घरी साजिदचा मृत्यू झाल्याबाबत पत्र पाठवले. या पत्रात साजिद मृत्यू झाला आहे, तसेच त्याचा मृतदेह कुठे आहे, असे लिहिले होते. या पत्राच्या आधारे साजिदचा मृतदेह कालव्याच्या काठावर सापडला आहे. मेरठचे एसपी केशव कुमार म्हणाले की, या संपूर्ण प्रकरणात नियमानुसार कायदेशीर कारवाई केली जात आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    पुढील बातम्या