मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

जुना मालकच निघाला चोर, दुसऱ्याला विकलेली कार आणली चोरून

जुना मालकच निघाला चोर, दुसऱ्याला विकलेली कार आणली चोरून

एकेकाळी कारचा मालक (Car owner) असणाऱ्या तरुणाने त्याच कारची चोरी (theft) केल्याची घटना समोर आली आहे.

एकेकाळी कारचा मालक (Car owner) असणाऱ्या तरुणाने त्याच कारची चोरी (theft) केल्याची घटना समोर आली आहे.

एकेकाळी कारचा मालक (Car owner) असणाऱ्या तरुणाने त्याच कारची चोरी (theft) केल्याची घटना समोर आली आहे.

    भोपाळ, 18 ऑगस्ट : एकेकाळी कारचा मालक (Car owner) असणाऱ्या तरुणाने त्याच कारची चोरी (theft) केल्याची घटना समोर आली आहे. बँकेतून कर्ज घेऊन (Car loan) घेतलेली कार कर्जाचे हफ्ते (EMI) न फेडल्यामुळे बँकेनं उचलून नेली होती. त्यानंतर ती कार बँकेकडून दुसऱ्या एकानं लिलावात विकत घेतली. मात्र तीच कार पुन्हा जुन्या मालकानं चोरून आणली. लॉकडाऊनमुळे गमावली कार मध्यप्रदेशमधील द्वारकापुरी भागात राहणाऱ्या अजयनं लॉकडाऊनपूर्वी काही महिने कार विकत घेतली होती. लाल रंगाची ही कार तो नियमित वापरत असे. मात्र लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर अजयच्या आर्थिक परिस्थितीवर त्याचा बिकट परिणाम झाला. त्याचं उत्पन्न बंद झालं आणि कार लोनचे मासिक हफ्ते भरणं त्याला जमेना. मुदतीपेक्षा अधिक काळ हफ्ते थकल्यामुळे बँकेंनं त्याची कार उचलून नेली होती. या घटनेनं अजयला जबर धक्का बसला होता. विकत घेततेली कार उचलून नेल्यानंतर नवी कार कशी घेता येईल, याचा विचार तो करत होता. त्यासाठी उत्पन्नाचे नवे स्रोत शोधण्याच्या विचारात तो होता. दिसली जुनी कार एक दिवस द्वारकापुरी भागातच अजयला त्याची जुनी कार दिसली. एका घरापुढं ती पार्क करण्यात आली होती. ती कार पाहताच चोरीचा विचार अजयच्या मनात आला आणि त्यानं कारची डुप्लिकेट चावी बनवून घेतली. त्याचा वापर करून त्यानं स्वतःचीच जुनी कार चोरली आणि ती घेऊन तो घरी आला, अशी बातमी 'दैनिक भास्कर'ने दिली आहे. अशी उघड झाली चोरी कार मालकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. त्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासली असताना कार चोरून नेताना एक तरुण पोलिसांना आढळला. त्याची देहबोली अजयशी मिळतीजुळती असल्याचं वाटल्याने पोलिसांनी थेट त्याच्या घरी धडक दिली. तेव्हा आपणच कार चोरली असल्याचं अजयनं कबूल केलं. पोलिसांनी ही कार ताब्यात घेतली असून ती मूळ मालकाला परत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अजयला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Indore, Indore News, Theft

    पुढील बातम्या