Home /News /crime /

लग्नानंतर तरुणाने सुरू केला पॉर्न बिझनेस; पत्नीने लॅपटॉप चेक केला तर हादरलीच!

लग्नानंतर तरुणाने सुरू केला पॉर्न बिझनेस; पत्नीने लॅपटॉप चेक केला तर हादरलीच!

तरुणीने अनेकदा याला विरोध केला होता, मात्र तो तिला जीवे मारण्याची धमकी देत होता.

    भोपाळ, 6 ऑगस्ट : मध्यप्रदेशातील एका गावात विचित्र प्रकार समोर आला आहे. येथील एक तरुणीला ऑनलाइन प्रेम जडलं आणि त्या दोघांनी लग्न करून संसारही थाटला. यासाठी तरुण गुजरातहून भिंड येथे आला. दोघांनी 2022 मध्ये लग्न केलं. लग्नानंतर तरुणाने पॉर्न व्हिडीओ शूट करण्यास सुरुवात केली. लग्नानंतर शरीर संबंधादरम्यान तरुण पत्नीसोबतचे व्हिडीओ शूट करीत होता. आणि याची पॉर्न फिल्म तयार करीत होता. पत्नीला जेव्हा याबाबत कळालं तर तिला धक्काच बसला. तिने पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल केला असून सध्या तिचा पती फरार झाला आहे. त्याचा शोध घेतला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 30 वर्षीय तरुणी चंबलमधील भिंडमध्ये राहत होती. तिने पोलिसांना सांगितलं की, गुजरातमध्ये राहणाऱ्या मितुल डोसी नावाच्या तरुणासोबत तिची ऑनलाइन ओळख झाली होती. ऑनलाइनच त्यांचं प्रेम झालं आणि त्यावेळी दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. यानंतर तरुण गुजरातहून भिंड येथे आला व दोघांनीही लग्न केलं. लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पॉर्न व्हिडीओ... पीडित तरुणाने पोलिसांना सांगितलं की, लग्नानंतर शरीर संबंध ठेवताना तो व्हिडीओ रेकॉर्ड करीत होता. तरुणीने अनेकदा याला विरोध केला होता, मात्र तो तिला जीवे मारण्याची धमकी देत होता. याशिवाय तिला मारहाणही करीत होता. एकेदिवशी तिने पतीचा लॅपटॉप चेक केला तर तिला धक्काच बसला. त्याच्या लॅपटॉपमध्ये अनेक तरुणींचे पॉर्न व्हिडीओ होते. शेवती तरुणीने पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत तक्रार दाखल केली.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Gujrat, Madhya pradesh, Marriage

    पुढील बातम्या