मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

धक्कादायक! वडिलांनी मुलाच्या तोंडात ठेवली सिगारेट; पेटवण्यासाठी माचिस नाही तर AK-47 घेतली अन्...

धक्कादायक! वडिलांनी मुलाच्या तोंडात ठेवली सिगारेट; पेटवण्यासाठी माचिस नाही तर AK-47 घेतली अन्...

या पित्याने आपल्या मुलाच्या तोंडात सिगरेट अडकवून ती चक्क बंदुकीने जाळण्याचा प्रयत्न केला (Man Shoots at Cigarette Held in Son’s Mouth). यावेळी थोडीही चूक झाली असती तरी गोळी थेट या मुलाच्या तोंडात गेली असती.

  • Published by:  Kiran Pharate
नवी दिल्ली 06 मे : पालक आपल्या मुलांचं संरक्षण करण्यात नेहमीच पुढे असतात. कितीही त्रास झाला तरी ते आपल्या मुलांना सर्व अडचणींपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. मात्र अनेकवेळा अशी प्रकरणं पाहायला मिळतात, जी अतिशय धक्कादायक असतात. अनेकवेळा पालक जाणूनबुजून मुलांचं आयुष्य संकटात टाकतात. अशाच एका निष्काळजी वडिलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पित्याने आपल्या मुलाच्या तोंडात सिगरेट अडकवून ती चक्क बंदुकीने जाळण्याचा प्रयत्न केला (Man Shoots at Cigarette Held in Son’s Mouth). यावेळी थोडीही चूक झाली असती तरी गोळी थेट या मुलाच्या तोंडात गेली असती. पत्नी अन् दोन मुलींना स्फोटकांनी उडवलं; रिक्षात फिट केलं मृत्यूचं सामान, बसताच मोठा ब्लास्ट व्हायरल होत असलेला हा हृदयद्रावक व्हिडिओ इराकमधील आहे. वडिलांची आणि मुलाची ओळख लपवण्यात आली असली तरी फोटोमध्ये वडिलांनी मुलाच्या चेहऱ्याजवळ बंदुक पकडल्याचं स्पष्ट दिसतं. आपल्या मुलाला टार्गेट बनवत त्याने मुलाच्या तोंडात सिगारेट अडकवली होती. यानंतर त्याने गोळी झाडून सिगारेट पेटवण्याचा प्रयत्न केला. रिपोर्ट्सनुसार, या वडिलांनी आपल्या मुलाला सिगारेट तोंडात दाबून उभं राहण्यास सांगितलं. जेणेकरून तो आपलं नेमबाजीचं कौशल्य दाखवू शकेल. हा व्हिडिओ सगळ्यांनाच धक्का बसला. यात थो़डीशी चूकही अतिशय महागात पडू शकत होती. वडिलांच्या सांगण्यावरून मुलाने सिगारेट दातात अडकवली. यानंतर आकाशाकडे मान वळवून तो आरामात टार्गेट बनला. त्याचे वडील दूर हातात एके ४७ घेऊन उभे असलेले दिसले. प्रथम तो जमिनीवर बसला. यानंतर, हातात रायफल घेऊन त्याने मुलाला टार्गेट केलं. मुलाच्या तोंडात असलेली सिगारेट गोळीने पेटवण्याचा त्याचा उद्देश होता. मात्र यावेळी मोठा अपघात होण्याची शक्यता होती. कायच्या काय! PUBG खेळता खेळता नांदेडहून गाठलं नाशिक, 12 वर्षीय मुलाचा अजब प्रताप गोळीचा आवाज ऐकताच या मुलाचा थरकाप उडाल्याचं पाहायला मिळतं. यानंतर त्याने आपल्या दातातून सिगारेट काढली आणि वडिलांनी योग्य निशाण्यावर गोळी मारून सिगारेट कशी पेटवली हे कॅमेऱ्यासमोर दाखवलं. मात्र, हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच लोकांनी वडिलांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. आपलं कौशल्य दाखवण्यासाठी एका बापाने आपल्या मुलाचा जीव धोक्यात घातल्याचं पाहून लोक थक्क झाले आहेत.
First published:

Tags: Gun firing, Shocking news

पुढील बातम्या