Home /News /crime /

लग्नाला नकार दिला म्हणून तरुणीवर झाडली गोळी; Tiktok वर झाली होती मैत्री

लग्नाला नकार दिला म्हणून तरुणीवर झाडली गोळी; Tiktok वर झाली होती मैत्री

Delhi Crime: लग्नाला (Marriage) नकार दिला म्हणून आरोपीनं महिलेच्या पोटात गोळी (Bullet) मारली आहे. या हल्ल्यात पीडित गंभीर जखमी (Injured) झाली असून तिच्यावर रूग्णालयात (Hospital) उपचार सुरू आहेत. करण आणि पीडित मुलीची ओळख टिकटॉकवर (Tiktok) झाली होती.

पुढे वाचा ...
    दिल्ली, 22 डिसेंबर:  लग्नाला (Marriage) नकार दिला म्हणून एका व्यक्तीनं थेट एका तरुणीवर गोळी झाडली आहे. ही घटना शुक्रवारी घडली असून फरार आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. दिल्लीतील (Delhi) मोहन गार्डन (Mohan Garden) भागात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. TikTok या व्हीडिओ शेअरिंग आणि सोशल नेटवर्किंग applicationवर या मुलीशी त्याची ओळख झाली होती. त्यांच्यात मैत्री होती. करण आणि प्रवीण अशी या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. करण हा हरियाणातील सोनीपत येथील रहिवाशी असून प्रवीण हा पानिपतचा रहिवाशी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी घडली असून लग्नाला नकार दिला म्हणून आरोपीनं महिलेच्या पोटात गोळी झाडली.  या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. करण आणि ही मुलगी यांची ओळख टिकटॉकवर झाली होती. आता या सोशल साइटवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. चिनी अॅप्लिकेशन असल्याने ते वापरायला हल्ली बंदी आहे. पण या व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्मवर करण आणि या मुलीची ओळख झाली. मैत्रीही झाली. आपण लग्न करू असं करण या मुलीला सांगत असे. तिच्याशी लग्न करण्यासाठी तो दिल्लीला आला होता. पण करणचं अगोदरचं लग्न झाल्याचं कळल्यानंतर संबंधित मुलीनं लग्नाला नकार दिला. टिकटॉवर झाली होती मैत्री द्वारकाचे डीसीपी संतोष कुमार मीणा यांनी सांगितलं की, शनिवारी आम्हाला आरोपींबद्दल मिळाल्यानंतर आम्ही गोयला गावातून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. करण हा 10 महिन्यांपूर्वी टिकटॉकच्या माध्यमातून पीडित मुलीच्या संपर्कात आला होता. करण हा विवाहित असून त्याला दोन मुलं आहेत. परंतु करणने ही माहिती पीडित मुलीपासून लपवली होती. तीन महिन्यांपूर्वी करण हा विवाहित असल्याचं पीडित मुलीला समजलं. त्यानंतर तिनं आरोपी करणकडे दुर्लक्ष करण्यास सुरवात केली. दरम्यान पीडित मुलीनं लग्न करावं असा हट्ट तिच्या कुटुंबियांनी धरला. पण तिनं दुसर्‍या मुलाशी लग्न करावं अशी इच्छा आरोपीची नव्हती. त्यामुळे आरोपी करणने मोहन गार्डन येथून एक दुचाकी चोरली आणि प्रवीणकडून देशी कट्टा विकत घेतला. त्यानंतर शुक्रवारी तो पीडितेच्या घरी गेला आणि काही कळायच्या आतचं त्यानं तिच्यावर गोळी झाडली. या हल्ल्यात पीडित मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime, Delhi

    पुढील बातम्या