मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

188 मुलांचा बाप असल्याचं सांगत थेट सरकारलाच फसवलं, 19 कोटी रूपयांचा गंडा

188 मुलांचा बाप असल्याचं सांगत थेट सरकारलाच फसवलं, 19 कोटी रूपयांचा गंडा

परदेशात बेरोजगारांचा किंवा मुलांच्या संगोपनाचा खर्च सरकार करतं. याच गोष्टीचा फायदा घेत या व्यक्तीने आपल्या खोट्या 188 मुलांच्या (188 Fake Childrens) संगोपनाच्या नावावर सरकारकडून 19 कोटी रूपये घेतले

परदेशात बेरोजगारांचा किंवा मुलांच्या संगोपनाचा खर्च सरकार करतं. याच गोष्टीचा फायदा घेत या व्यक्तीने आपल्या खोट्या 188 मुलांच्या (188 Fake Childrens) संगोपनाच्या नावावर सरकारकडून 19 कोटी रूपये घेतले

परदेशात बेरोजगारांचा किंवा मुलांच्या संगोपनाचा खर्च सरकार करतं. याच गोष्टीचा फायदा घेत या व्यक्तीने आपल्या खोट्या 188 मुलांच्या (188 Fake Childrens) संगोपनाच्या नावावर सरकारकडून 19 कोटी रूपये घेतले

  नवी दिल्ली 06 मार्च : आजच्या काळात लोक अगदी सोप्या मार्गाने पैसे कमावण्याचे पर्याय शोधत असतात. यासाठी फ्रॉडचे अनेक वेगवेगळे प्रकार शोधले जातात (Weird Fraud Case). यूकेमध्ये राहाणाऱ्या एका 40 वर्षीय व्यक्तीनेही अशीच अजब पद्धत शोधली आणि त्याने सरकाराकडून फसवणूक करून तब्बल 19 कोटी रूपये लुटले (Fraud Cheated 19 Crore Rupees) . जेव्हा त्या व्यक्तीचा कारनामा समोर आला तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. फसवणूक करण्याच्या या पद्धतीवर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. परदेशात बेरोजगारांचा किंवा मुलांच्या संगोपनाचा खर्च सरकार करतं. याच गोष्टीचा फायदा घेत या व्यक्तीने आपल्या खोट्या 188 मुलांच्या (188 Fake Children's) संगोपनाच्या नावावर सरकारकडून 19 कोटी रूपये घेतले. पत्नीसाठी जेवण बनवायला विसरला पती; भडकलेल्या महिलेनं घरी येताच बनवलं 'नपुंसक' या व्यक्तीची ओळख 40 वर्षीय अली बाना मोहम्मद अशी झाली आहे. त्याने आपल्या खोट्या 188 मुलांच्या संगोपनाच्या नावाने सरकारकडून 19 कोटी रूपये घेतले. यासाठी त्याने आपल्या काही मित्रांची आणि नातेवाईकांची मदत घेतली. खरंतर अलीला एकही मूल नाही. त्याने आपल्या सगळ्या काल्पनिक मुलांची माहिती आपल्या डायरीमध्ये लिहिली होती. याच्याच आधारावर तो त्यांच्या संगोपनासाठी क्लेम करत असे. तोपर्यंत त्याला चाईल्ड बेनिफिट आणि टॅक्स क्रेडिट पेमेंट मिळत राहिलं, जोपर्यंत HM रेव्हेन्यू आणि कस्टमच्या इन्व्हेस्टिगेटर्सला या प्रकरणाची चाहूल लागली नाही. अधिकाऱ्यांना आढळलं की दोन नंबरहून अनेकदा क्लेमसाठी कॉल आले आहेत. नंबर तोच राहातो मात्र मुलाची ओळख बदलेलली असते. यानंतर डिपार्टमेंट ऑफ वर्क अॅण्ड पेन्शनने हे प्रकरण गांभीर्याने घेत यासाठी एक ऑपरेशन सुरू केलं, यातूनच संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाला. या प्रकरणात जोडल्या गेलेल्या सहा लोकांना तब्बल १३ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. तर या सगळ्याचा मास्टरमाईंड असलेल्या अलीला साडेतीन वर्षासाठी जेलमध्ये ठेवण्यात आलं. याआधीही ड्रग्ज केसमध्ये तो 16 वर्ष तुरुंगात होता.

  नवरा-बायकोच्या संसारात मेव्हणी ठरली 'साली';सख्ख्या बहिणीच्या घरात सवत म्हणून आली

  कोर्टात समजलं की अलीने जवळपास 70 वेगवेगळ्या नावांनी आपल्या 188 खोट्या मुलांसाठी चाईल्ड बेनिफिट घेतलं होतं. काही केसेसमध्ये त्याने दुसऱ्या लोकांचे आयडी चोरले होते, तर अनेक नातेवाईकांच्या आयडीचाही वापर केला होता. त्याच्याकडे एक डायरी होती. यात तो आपल्या १८८ खोट्या मुलांची नावं लिहित असे. जेणेकरून कधी कोणी एखाद्या मुलाची माहिती मागितली, तर त्याला ती लगेच देता येईल. याच कारणामुळे अनेक वर्ष कोणालाच त्याच्यावर संशय आला नाही.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Crime news, Financial fraud

  पुढील बातम्या