Home /News /crime /

विकृतीचा कळस! नराधमानं 6 वर्षीय चिमुकलीच्या गुप्तांगात मिरची, दगड टाकले अन्...

विकृतीचा कळस! नराधमानं 6 वर्षीय चिमुकलीच्या गुप्तांगात मिरची, दगड टाकले अन्...

 पीडित तरुणीनं लग्नासाठी नकार दिल्याच्या रागात आरोपीनं पीडितेला भररस्त्यात अडवून तिच्याशी विकृत कृत्य केलं आहे.

पीडित तरुणीनं लग्नासाठी नकार दिल्याच्या रागात आरोपीनं पीडितेला भररस्त्यात अडवून तिच्याशी विकृत कृत्य केलं आहे.

नराधमानी आधी चिमुकलीवर बलात्कार केला (Man Rapes Minor Girl) आणि यानंतर तिच्या गुप्तांगामध्ये दगड तसंच मिरची भरली (Man Stuffs Chillies In Private Part of Six Years Old Girl).

    विजयवाडा 26 ऑगस्ट : एक अत्यंत धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. या घटनेत एका सहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार करत नराधमानी विकृतीचा कळस गाठला आहे. या नराधमानी आधी चिमुकलीवर बलात्कार केला (Man Rapes Minor Girl) आणि यानंतर तिच्या गुप्तांगामध्ये दगड तसंच मिरची भरली (Man Stuffs Chilies In Private Part of Six Years Old Girl). ही धक्कादायक घटना आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) विजयवाडा (Vijayawada) येथून समोर आली आहे. 13 वर्षीय भावाला PORN VIDEO दाखवायची बहिण; पुढे जे घडलं त्यानं मुंबई हादरली टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेल्या वृत्तानुसार, ही घटना विजयवाडाच्या इब्राहिमपट्टनम ठाण्याच्या क्षेत्रातील कोंडापल्ली गावात घडली आहे. यात सहा वर्षाची मुलगी खेळण्यासाठी आपल्या घराच्या बाहेर निघाली होती. मात्र, नराधमानी तिला स्नॅक्स देण्याचं आमिष दाखवलं आणि तिला शेतात घेऊन गेले. यानंतर आरोपीनी चिमुकलीवर बलात्कार केला. यादरम्यान पीडिता बेशुद्ध झाली. अन् फोटोतील तिघांनी सोडलं जग, एकटीच महिला उरली; साताऱ्यातील खळबळजनक घटना समोर आलेल्या वृत्तानुसार, शुद्धीवर आल्यानंतर ही चिमुकली आपल्या घरी पोहोचली. तिथे तिच्या आई वडिलांच्या लक्षात आलं की तिच्या गुप्तांगातून रक्त येत आहे. आई वडिलांनी तपासणी केली असता तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये मिरची आणि दगड आढळून आले. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मात्र, अद्याप आरोपीची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं, की आरोपीनं चिमुकलीसोबत अत्यंत क्रूर कृत्य केलं आहे. पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत. नवऱ्यानंतर आईनंही घेतला जगाचा निरोप; हताश महिलेनं लेकीसह असा केला आयुष्याचा शेवट
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Crime news, Rape case

    पुढील बातम्या