कौशांबी, 19 नोव्हेंबर : उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातून एक वेगळीच घटना समोर आली आहे. साखरपुड्यानंतर तरुणीसोबत होणाऱ्या नवऱ्याने बळजबरीने शारिरिक संबंध ठेवले. यातून ती सात महिन्यांची गरोदर राहिली. या तरुणीशी होणाऱ्या नवऱ्याने लग्न करण्याचा निर्णय घेत संबंध तोडले होते. या घटनेत न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण -
एसपींच्या आदेशानंतर पोलिसांनी पीडित मुलगी आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याला मांझनपूर पोलीस ठाण्यात बोलावले. पोलिसांनी पीडितेचे जबाब नोंदवून आरोपीला संबंध तोडण्याचे कारण विचारले असता, तो उत्तर देऊ शकला नाही. पोलिसांच्या चौकशीत त्याने लग्नापूर्वी मुलीशी संबंध ठेवल्याची कबुलीही दिली.
पोलिसांनी त्या तरुणाची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला पण तो लग्नासाठी झाला नाही. त्यानंतर पोलिसांनी पीडिता आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याला मॅजिस्ट्रेट यांच्यासमोर हजर केले. मॅजिस्ट्रेट यांनी पीडितेचे म्हणणे नोंदवत त्या तरुणाला कायदेशीर कारवाईबाबत बोलले, तो आणि आणि त्याचे कुटुंबीय लग्नासाठी सहमत झाले.
मजिस्ट्रेट यांच्या उपस्थितीत दोन्ही पक्षांनी लग्नाला संमती दिली. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या दोन साक्षीदारांसमोर करार करण्यात आला. पोलिसांनी लगेच लग्न लावून दिले. त्यानंतर मुलीने आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत देवाला साक्षी मानून हिंदू रितीरिवाजांनुसार जवळच्या मंदिरात सात फेरे घेतले. यावेळी दोन्ही पक्षांसह पोलीस स्वत: लग्नाचे साक्षीदार झाले. यावेळी कन्यापक्षाने आपल्या मुलीला आपल्या स्थितीनुसार हुंडा दान करून निरोप दिला. ही घटना मांझनपूर पोलीस ठाणे हद्दीतील आहे.
हेही वाचा - लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार, विद्यार्थिनीचा प्राध्यापकावर आरोप; घटनेने खळबळ
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पीडिता तिच्या वडिलांसोबत या प्रकरणाची तक्रार घेऊन एसपी कार्यालयात पोहोचली होती. पीडितेच्या वडिलांनी आरोप केला होता की, त्याने आठ महिन्यांपूर्वी आपल्या मुलीची लग्न पश्चिम शरीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महावा गावात राहणाऱ्या धर्मराजसोबत केली होती. लग्नानंतर तो नोकरीसाठी परदेशात गेला. यादरम्यान आरोपी धर्मराजने आपल्या मुलीशी फोनवर बोलत असताना तिला फिरायला नेण्याच्या बहाण्याने आपल्याजवळ बोलावले आणि निर्जनस्थळी नेऊन जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर माझी मुलगी सात महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर त्याने लग्न मोडले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Rape, Uttar pradesh news