Home /News /crime /

हुंड्यात बुलेट दिली नाही म्हणून चार मित्रांकडून पत्नीवर गँगरेप, पतीनेच शूट केला VIDEO

हुंड्यात बुलेट दिली नाही म्हणून चार मित्रांकडून पत्नीवर गँगरेप, पतीनेच शूट केला VIDEO

हुंड्यात बुलेट दिली नाही म्हणून पत्नीला मित्रांच्या ताब्यात देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

    पटना, 04 मार्च : लग्नात हुंडा घेणं कायद्याने गुन्हा असूनही अद्याप हुंडाबळी आणि हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळाचे प्रकार घडत आहेत. आता एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हुंड्यात बुलेट दिली नाही म्हणून पत्नीला मित्रांच्या ताब्यात देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. इतकंच नाही तर त्यावर कळस करत गँगरेपचा व्हिडिओ शूट करून तो व्हायरल करण्याची धमकीही देण्यात आली आहे. बिहारमधील बैरिया पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावात हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेनं मुख्यमंत्र्यांकडे अर्ज केला आहे. त्यानंतर डीजीपींच्या आदेशावरून बैरिया पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितलं की, गुन्हा दाखल केल्यानंतर कारवाई सुरू आहे. बलात्कारानंतर पीडितेनं 30 नोव्हेंबर 2017 मध्ये एका मुलीला जन्म दिला. आरोपीने 14 सप्टेंबर 2018 मध्ये पीडितेला तिच्या माहेरी जाऊ दिलं. त्यानंतर पीडितेनं सर्व प्रकार तिच्या घरच्यांना सांगितलं. पीडितेचे वडील दिल्लीत रिक्षा चालवतात. पीडित महिलेनं दिलेल्या तक्रारीत म्हटलं की,'आरोपीसोबत 27 डिसेंबर 2014 ला मुस्लिम पद्धतीने लग्न झालं. लग्नानंतर तीन-चार महिने पती चांगला राहिला. त्यानंतर मारहाण, छळ सुरू झाला. त्यानंतर पीडितेला माहेरच्या लोकांकडून बुलेट आणण्यासाठी छळू लागला. जेव्हा बुलेट मिळेल तेव्हाच सोबत ठेवेन अशी धमकीही दिली. 18 ऑगस्ट 2016 ला पती घरातून गेला त्यानंतर दोन महिन्यांनी 29 ऑक्टोंबर 2016 ला परत आला. त्यानंतर पीडितेचे सर्व दागिने विकून टाकले. 16 नोव्हेंबर 2016 ला मित्राच्या घरी पार्टी आहे म्हणून घेऊन गेला आणि त्या ठिकाणी चार मित्रांनी बलात्कार केला. यावेळी व्हिडिओ शूटिंगही केलं. तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्यानं पीडितेनं मौन बाळगलं. त्यानंतर तिला माहेरच्या लोकांशी बोलायलासुद्धा बंदी घातली. माहेरी परतल्यानंतर 29 डिसेंबर 2019 मध्ये बिहारच्या मुख्यमंत्र्यांकडे याबाबत अर्ज केला. आणि त्यानंतर दोन महिन्यांनी पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली. याबद्दल सांगताना पोलिस म्हणाले की, प्रकरणाची चौकशी सुरु आहे. यातील दोषींना मोकळं सोडलं जाणार नाही. पीडितेला न्याय मिळवून देऊ. हे वाचा : 6 वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार, 4 दिवसांत 3 दोषींना सुनावली फाशीची शिक्षा
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Crime, Gang rape

    पुढील बातम्या