मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /Cold Blooded! मी वहिनीचा खून केलाय, पोलीस स्टेशनमध्ये जात आरोपीची कबुली

Cold Blooded! मी वहिनीचा खून केलाय, पोलीस स्टेशनमध्ये जात आरोपीची कबुली

 आपण आपल्या वहिनीचा (Man murdered sister in law and surrendered himself to police) खून केला असून आपल्याला अटक करा, अशी मागणी एका आरोपीनं पोलीस ठाण्यात जाऊन केली.

आपण आपल्या वहिनीचा (Man murdered sister in law and surrendered himself to police) खून केला असून आपल्याला अटक करा, अशी मागणी एका आरोपीनं पोलीस ठाण्यात जाऊन केली.

आपण आपल्या वहिनीचा (Man murdered sister in law and surrendered himself to police) खून केला असून आपल्याला अटक करा, अशी मागणी एका आरोपीनं पोलीस ठाण्यात जाऊन केली.

नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर: आपण आपल्या वहिनीचा (Man murdered sister in law and surrendered himself to police) खून केला असून आपल्याला अटक करा, अशी मागणी एका आरोपीनं पोलीस ठाण्यात जाऊन केली. या विक्षिप्त आरोपीला पाहून पोलिसांना (Police shocked to see the case) सुरुवातीला धक्का बसला. आपल्या वहिनीची म्हणजे सावत्र भावाच्या पत्नीची निर्घृण हत्या करून हा आरोप उजळ माथ्याने पोलीस ठाण्यात पोहोचला आणि स्वतःच्या आरोपांच कबुली देत (Cold blooded murder) पोलिसांकरवी अटक करवून घेतली.

अशी घडली घटना

दिल्लीत राहणाऱ्या आरोपीचा त्याच्या वहिनीवर राग होता. हत्या झालेली महिला ही आरोपीच्या सावत्र भावाची पत्नी होती. ती दिल्ली विद्यापीठात प्राध्यापिका म्हणून काम करत होती. असिस्टंट प्रोफेसर असणाऱ्या या महिलेचं काही महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. मात्र काही कारणांमुळे तिच्या दीराचं आणि तिचं सतत भांडण होत होतं.

अशी झाली हत्या

घटनेच्या दिवशी आरोपी आणि त्याच्या वहिनीमध्ये जोरदार झटापट झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपीने त्याच्या वहिनीचा गळा आवळून तिला बेशुद्ध केलं आणि तिला वीजेचा जोरदार शॉक दिला. त्यानंतर तिची ओढणी तिच्या गळ्याभोवती गुंडाळून तिचा जीव घेतला. खून केल्यानंतर आरोपी स्वतःच पोलीस ठाण्यात गेला आणि आपण खून केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली.

पोलिसांची घटनास्थळी धाव

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीनं दिलेल्या माहितीची खातरजमा केली. महिलेचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून तो पोस्टमॉर्टेमसाठी पाठवून देण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने त्याच्या वहिनीचा खून नेमक्या कुठल्या कारणासाठी केला, याबाबत मात्र कुठलाही माहिती मिळू शकलेली नाही.

हे वाचा-गड आला पण सिंह गेला', सामनावीर ठरलेल्या क्रिकेटपटूला मैदानातच मृत्यूने गाठलं

अनैतिक संबंधांची चर्चा

दीर राकेश आणि त्याची वहिनी पिंकी यांच्यात अवैध संबंध असल्याची चर्चा नातेवाईकांमध्ये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. या हत्येमागे अनैतिक संबंधांची पार्श्वभूमी होती की इतर काही कारण होतं, याचा शोध पोलीस घेत आहेत.

First published:
top videos

    Tags: Crime, Murder, Police