मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

तव्यानं गळ्यावर वार करून केली प्रेयसीची हत्या, तीन वर्षांच्या अफेअरचा अंत

तव्यानं गळ्यावर वार करून केली प्रेयसीची हत्या, तीन वर्षांच्या अफेअरचा अंत

आपले जिच्यासोबत विवाहबाह्य संबंध आहेत, तिच्या चारित्र्यावर संशय आल्यामुळे प्रियकराने तिची निर्घृण हत्या केली आहे.

आपले जिच्यासोबत विवाहबाह्य संबंध आहेत, तिच्या चारित्र्यावर संशय आल्यामुळे प्रियकराने तिची निर्घृण हत्या केली आहे.

आपले जिच्यासोबत विवाहबाह्य संबंध आहेत, तिच्या चारित्र्यावर संशय आल्यामुळे प्रियकराने तिची निर्घृण हत्या केली आहे.

  • Published by:  desk news

जयपूर, 20 डिसेंबर: आपल्या प्रेयसीवर (Girlfriend) लोखंडी तव्याने जोरदार वार (Strong attack) करून प्रियकराने तिचा खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दोघांचंही लग्न झालेलं होतं (Married) आणि एकमेकांच्या वैवाहिक जोडीदारापासून लपून त्यांचं प्रेमप्रकरण (Extra Marital Affair) सुरू होतं. त्यातून निर्माण झालेल्या संशयामुळे प्रियकराला राग अनावर झाला आणि त्याने किचनमधील लोखंडी तव्याने प्रेयसीच्या गळ्यावर वार केले. वार वर्मी लागल्यामुळे प्रेयसीचा जागीच मृत्यू झाला.

सुरू होतं प्रेमप्रकरण

आरोपी शिशुपाल आणि राणकी यांचं गेल्या तीन वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू होतं. दोघांचंही लग्न झालं असून दोघांनाही तीन-तीन मुलं आहेत. काही दिवसांपूर्वी राणकीचं तिच्या पतीशी भांडण झालं होतं आणि ती माहेरी येऊन राहत होती. तिथेच तिची शिशुपालसोबत ओळख झाली आणि त्यांच्यात प्रेमप्रकरण सुरू झालं. गेली तीन वर्षं ही प्रेमप्रकरण सुरू होतं. जेव्हा जेव्हा राणकी माहेरी येत असे, तेव्हा ती शिशुपालला भेटत होती.

शिशुपालला आला संशय

सध्या पतीची झालेल्या भांडणामुळे राणकी अनेक आठवड्यांपासून माहेरीच राहिली होती. या काळात तिचे आपल्याव्यतिरिक्त अन्य एखाद्या पुरुषासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय शिशुपालला आला. त्याने याबाबत तिच्याकडे विचारणाही केली आणि धमकी दिली. आपल्याला संशय येण्यासारखं काही घडलं, तर तुझं काही खरं नाही, असंही तो म्हणाला होता

त्याच दिवशी केला खून

शिशुपाल आपला मोबाईल काढून घेईल, या भितीने राणकीने तो इतर कुणाकडून घरी पाठवून दिला. तिच्या या कृतीचा संशय आल्याने रागाने वेडापिसा झालेला शिशुपाल तिच्या घरी पोहोचला. तिथे त्याने याबाबत जाब विचारला. याच मुद्द्यावरून दोघांमध्ये जोरदार भांडणं झाली आणि शिशुपालनं तिथे असणारा लोखंडी तवा उचलून राणकीच्या गळ्यावर वार केले. वार जिव्हारी लागल्यामुळे राणकीचा मृत्यू झाला.

हे वाचा- आईस्क्रीम विकणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू, अनोख्या अंत्ययात्रेनं भारावलं वातावरण

पोलीस तपास सुरू

पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली राणकी आणि तिच्याशेजारी असणारा तवा यांच्या आधारे तपास सुरू केला आहे. घटनेच्या पाच तास पूर्वी राणकी आणि शिशुपाल एका ठिकाणी भेटल्याचं आणि त्यांच्यात वाद झाल्याचं सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांना मिळालं आहे. त्याच्या आधारे तपास सुरू असून फरार शिशुपालचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेनं राजस्थानमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

First published:

Tags: Crime, Girlfriend, Murder, Police, Rajasthan