नराधमांनी 8 वर्षांच्या चिमुकलीला बनवलं शिकार, मन भरलं म्हणून केला खून

शनिवारी सकाळी ग्रामस्थांनी रक्ताच्या थारोळ्यात मुलीचा मृतदेह पाहिला आणि परिसरात एकच खळबळ उडाली.

शनिवारी सकाळी ग्रामस्थांनी रक्ताच्या थारोळ्यात मुलीचा मृतदेह पाहिला आणि परिसरात एकच खळबळ उडाली.

  • Share this:
    बरेली, 20 जून : देशात कोरोनाच्या महामारीमुळे अजूनही लॉकडाऊन सुरू आहे. अशात बलात्कार आणि हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काही अज्ञात लोकांनी 8 वर्षीय अल्पवयीन मुलीची बलात्कार करून हत्या केली आणि मृतदेह शेतात टाकून पळ काढला. शनिवारी सकाळी ग्रामस्थांनी रक्ताच्या थारोळ्यात मुलीचा मृतदेह पाहिला आणि परिसरात एकच खळबळ उडाली. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरू केला असून या घटनेमुळे पीडितेच्या कुटुंबात दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सुशांतला नाही विसरू शकत युजवेंद्र चहल, शेअर केली सगळ्यात वेदनादायक पोस्ट मिळालेल्या माहितीनुसार, एका लग्नात सहभागी होण्यासाठी शुक्रवारी कुटुंब गावी आलं होतं. इथे वरातीच्या स्वागताच्या कार्यक्रमावेळी मुलगी अचानक गायब झाली. रात्री उशिरा मुलीच्या घरातील लोकांना ती गायब असल्याची माहिती मिळाली आणि सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. पण तिचा कुठेही शोध लागला नाही. घटनेची माहिती मिळताच एसएसपी आणि एसपी ग्रामीण भागातील फॉरेन्सिक टीम आणि श्वानपथक गाठलं आणि याप्रकरणी तपास सुरू केला. Solar Eclipse: भर दिवसा होईल अंधार! 25 वर्षानंतर सूर्यग्रहणामुळे असे दिसेल दृश्य या प्रकरणात ग्रामीण भागातील एसपी डॉ. संसारसिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या हत्येची माहिती मिळताच ते एसएसपीसह घटनास्थळी गेले. या निष्पाप मुलीवर बलात्कार झाला आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आली असा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात पोलीस पुढील तपास करत असून आरोपींचा शोध घेण्यासाठी एक टीम काम करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. कोरोनाच्या उपचारासाठी मुंबईची ही कंपनी तयार करणार औषध, DCGIने दिली परवानगी संपादन - रेणुका धायबर
    First published: