मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

नात्यात धोक्याचा 'VIRUS', सॉफ्टवेअर इंजिनियरने केली 5 दिवसांत 2 लग्न

नात्यात धोक्याचा 'VIRUS', सॉफ्टवेअर इंजिनियरने केली 5 दिवसांत 2 लग्न

लग्नानंतर पतीचं धक्कादायक सत्य समोर आलं आणि कुटुंबीयांच्या पायाखलची जमीनच सरकली. नेमका काय घडला प्रकार वाचा सविस्तर

लग्नानंतर पतीचं धक्कादायक सत्य समोर आलं आणि कुटुंबीयांच्या पायाखलची जमीनच सरकली. नेमका काय घडला प्रकार वाचा सविस्तर

लग्नानंतर पतीचं धक्कादायक सत्य समोर आलं आणि कुटुंबीयांच्या पायाखलची जमीनच सरकली. नेमका काय घडला प्रकार वाचा सविस्तर

  • Published by:  Kranti Kanetkar
इंदौर, 21 डिसेंबर : लग्नानंतर एका नव्या आयुष्याची सुरुवात करण्याची स्वप्न उराशी बाळगलेल्या तरुणीसह कुटुंबीयांची मोठी निराशा झाली. लग्नानंतर पतीचं धक्कादायक सत्य समोर आलं आणि कुटुंबीयांच्या पायाखलची जमीनच सरकली. सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या 26 वर्षीय तरुणानं 5 दिवसांत दोन लग्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा तरुण फरार झाला असून पोलिसांकडून सध्या तपास सुरू आहे. आरोपी सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या तरुणानं 2 डिसेंबरला एका महिलेसोबत विवाह केला होता. त्यानंतर 5 डिसेंबर रोजी इंदूरमधील महू इथे दुसऱ्या महिलेसोबत लग्न केलं. खंडवा इथे राहणाऱ्या पहिल्या पत्नी आणि त्याच्या कुटुंबीयांनी या तरुणाविरोधात फसवणुकीचा आरोप करत पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला प्रकार सांगितला. पीडित कुटुंबीयांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तक्रार दाखल केली असून आरोपी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये घडली. मिळालेल्या माहितीनुसार 2 डिसेंबरला विवाहबंधनात अडकल्यानंतर 7 डिसेंबरला 5 दिवसांनी इंदूर इथल्या महू गावात पुन्हा एकदा लग्नासाठी हा आरोपी पोहोचला. याच दरम्यान उपस्थित असलेल्या नातेवाईकांपैकी एकानं या लग्नाचे फोटो काढून पाठवले आणि त्याची माहिती पहिल्या पत्नीच्या कुटुंबीयांना मिळाली. त्यानंतर कुटुंबीयांनी 26 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियर विरोधात तक्रार दाखल केली आहे. हे वाचा-पोलीस कर्मचाऱ्याचा दारू पिऊन धिंगाणा, नशेमध्येच काढली महिलेची छेड, Video Viral खंडवा इथल्या राहणाऱ्या नातेवाईकांचा आरोप आहे की या तरुणानं दुसरा विवाह केला आहे. आपल्या मुलीसोबत त्यांचं 2 डिसेंबरला लग्न झालं आणि त्यासाठी तब्बल 10 लाख रुपये खर्च केला इतकच नाही तर मुलाला अनेक वस्तू देखील दिल्या आणि त्याने आमची फसवणूक केली असा आरोप लावण्यात आला आहे. महिला महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात असल्याचं सांगितलं त्यावर विचारल्यावर भोपाळला जात आहे असे उत्तर मिळाले. हा आरोपी भोपाळला कामासाठी नाही तर महूला दुसऱ्या लग्नासाठी पोहोचल्याचा आरोप पीडितेच्या नातेवाईकांनी केला आहे. हे लग्न दोन्ही कुटुंबीयांना मान्य होतं आरोपीवर जबरदस्ती करण्यात आली नव्हती अशी माहिती पीडितेच्या नातेवाईकांनी दिली आहे. 7 डिसेंबरला झालेल्या लग्नानंतर आता आरोपी फरार आहे. या प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे.
First published:

Tags: Crime news, Madhya pradesh

पुढील बातम्या