क्रूरतेचा कडेलोट! शेजारच्याची हत्या करुन हृदय काढलं, बटाट्याच्या भाजीसोबत शिजवून खायला घातलं

क्रूरतेचा कडेलोट! शेजारच्याची हत्या करुन हृदय काढलं, बटाट्याच्या भाजीसोबत शिजवून खायला घातलं

आरोपीने तिघांची हत्या केली. यामधील एका व्यक्तीचं हृदय शरीरातून बाहेर काढले आणि ते स्वतःच्या काकाच्या घरी जाऊन शिजवलं

  • Share this:

ओक्लाहोमा (अमेरिका), 26 फेब्रुवारी: क्रूरतेचा कळस म्हणजे काय आणि माणूस कुठल्या थराला जाऊ शकतो याचं उदाहरण अमेरिकेत झालेल्या एका तिहेरी हत्याकांडामुळे समोर आलं. (America) अमेरिकेतील ओक्लाहोमामध्ये (Oklahoma) इथे तिहेरी हत्याकांडाची (triple murder case) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने तिघांची हत्या केली. यामध्ये शेजाऱ्याचाच एक खून करून एका व्यक्तीचं हृदय शरीरातून बाहेर काढलं आणि बटाट्याच्या भाजीसोबत ते शिजवून आपल्या कुटुंबातील सदस्यांना खायला घातले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

अमेरिकेतील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉरेन्स पॉल अँडरसन (Lawrence Anderson) असं या आरोपीचं नाव आहे. लॉरेन्सने सुरुवातीला शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीची हत्या केली. हत्येनंतर त्याने या व्यक्तीच्या शरीरातून हृदय बाहेर काढून ते आपल्या काकांच्या घरी घेऊन गेला. त्याने बटाट्याच्या भाजीसोबत हे हृदय शिजवून आपल्या काका आणि काकूंना खायला घातले.

लॉरेन्स एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने त्यानंतर काका आणि त्यांच्या चार वर्षांच्या नातीची हत्या केली. त्यासोबतच त्याने काकूची देखील हत्या करण्याचा प्रयत्न केला. पण सुदैवाने त्या वाचल्या. त्या या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी लॉरेंसला अटक करण्यात आली.

भारतीय महिलेनं सिंगापूरमध्ये मोलकरणीला छळ करून मारलं; आता आयुष्यभर फोडणार खडी

कोर्टामध्ये सादर केलेल्या सर्च वॉरंटमध्ये त्याने हे कृत्य का केले यामागचे धक्कादायक कारण सांगण्यात आलं आहे. त्यात असं म्हटलं आहे की, 'भूतांची सुटका करण्यासाठी त्यानं बटाट्यामध्ये हृदय शिजवून आपल्या कुटुंबाला खायला घातलं.'

लॉरेंसनं याआधी देखील अनेक गुन्हे केले आहेत. तो बरीच वर्षे तुरुंगात होता. ड्रग्ज प्रकरणामध्ये त्याला 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण नंतर त्याला जामीन देण्यात आला होता. दरम्यान लॉरेंसनं केलेल्या या तिहेरी हत्यांमुळे एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी त्याला कोर्टात हजर करण्यात आले त्यावेळी त्याने तिघांची हत्या केल्याची कबुली दिली.

First published: February 26, 2021, 10:16 PM IST
Tags:

ताज्या बातम्या