मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

अमानुषतेचा कळस! मजुरी मागितली म्हणून व्यक्तीच्या गुप्तांगात एअर कॉम्प्रेन्सरनं भरली हवा

अमानुषतेचा कळस! मजुरी मागितली म्हणून व्यक्तीच्या गुप्तांगात एअर कॉम्प्रेन्सरनं भरली हवा

क्रशरवर काम करणाऱ्या मजुराला आपल्या कामाचे पैसे मागणं म्हणजे आपल्यावर मृत्यू ओढवून घेण्यासारखं आहे असं स्वप्नात देखील वाटलं नसेल.

क्रशरवर काम करणाऱ्या मजुराला आपल्या कामाचे पैसे मागणं म्हणजे आपल्यावर मृत्यू ओढवून घेण्यासारखं आहे असं स्वप्नात देखील वाटलं नसेल.

क्रशरवर काम करणाऱ्या मजुराला आपल्या कामाचे पैसे मागणं म्हणजे आपल्यावर मृत्यू ओढवून घेण्यासारखं आहे असं स्वप्नात देखील वाटलं नसेल.

  • Published by:  Kranti Kanetkar
शिवपुरी, 27 डिसेंबर : कामावर असलेल्या एका मजुराला आपली मजुरी मागणं खूप महागात पडलं आहे. मजुरीचे पैसे मागणं व्यक्तीच्या जीवावर बेतलं आहे. मुजरी मागितल्याच्या रागातून इंचार्जनं मजुराच्या गुप्तांगात एअर कॉम्प्रेन्सरनं हवा भरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. क्रशरवर काम करणाऱ्या मजुराला आपल्या कामाचे पैसे मागणं म्हणजे आपल्यावर मृत्यू ओढवून घेण्यासारखं आहे असं स्वप्नात देखील वाटलं नसेल. मजुरीची पैसे मागितल्याच्या रागातून इंचार्जनं मजुराच्या गुप्तांगात एअर कॉम्प्रेन्सरनं हवा भरल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेत जखमी असलेल्या मजुरावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू होते आणि या उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना मध्य प्रदेशातील शिवपुरीपासून 70 कि.मी. अंतरावर असलेल्या गोवर्धन परिसरात घडली आहे. हे वाचा-प्रियकरासोबत घरात पाहिलं अन् घात झाला, बहिणीकडून अल्पवयीन भावाची हत्या मजुराच्या मृत्यूमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गाझीगड धारिया येथे राहणारा परमानंद हा धाकड गावाजवळ तोमर बिल्डर्सच्या गिट्टी क्रशरवर काम करायचा. मृताचा भाऊ धनीराम यांनी सांगितले की, भावाचा प्रभारी राजेश राय यांच्याशी 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता वाद झाला होता. रागाच्या भरात इंचार्जने मजुराच्या गुप्तांगात एअर कॉम्प्रेसरने हवा भरली. शरीरात हवा भरली गेल्यामुळे आतल्या धमन्यांना त्रास झाला आणि मजुराची स्थिती अत्यंत बिकट होती. त्याला तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र या मजुराचा आज मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. हरियाणामध्ये मित्राने चेष्टा करण्याच्या नादात गुप्तांगात भरली हवा मित्राने त्याच्यासोबत अत्यंत लज्जास्पद असा विनोद केला. त्याने चेष्टा करीत असताना मित्राच्या प्रायव्हेट पार्टमध्ये (Private Part) हवा भरली. त्यानेही मित्राची चेष्टा काहीही विरोध न करता सहन केली. यानंतर, त्याच्या आतड्यांना जखम झाली. तेव्हा मात्र क्रुरपणे सुरू असलेल्या चेष्टेची सीमा ओलांडली. त्रास होत असल्याचे पाहून घाईघाईने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
First published:

Tags: Madhya pradesh

पुढील बातम्या