मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /पत्नीपेक्षा त्याला सोन्याची अंगठी महत्त्वाची वाटली; पतीचं धक्कादायक कांड वाचून सरकेल पायाखालची जमीन

पत्नीपेक्षा त्याला सोन्याची अंगठी महत्त्वाची वाटली; पतीचं धक्कादायक कांड वाचून सरकेल पायाखालची जमीन

माहेरकडील लोकांनी हुंड्यासाठी पिंकी देवीची हत्या केली गेली असल्याचा आरोप केला आहे.  तर इतर लोकांचं म्हणणं आहे की, महिलेचा पती दीपक शाह याचे दुसऱ्या महिलेसोबत अवैध संबंध होते, ज्याला पिंकी देवीने विरोध केला होता.

  • Local18
  • Last Updated :
  • Patna, India

पाटणा 19 मार्च : पुन्हा एकदा हुंडा आणि अवैध संबंधातून एका विवाहितेची हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. बिहारमधील बेगुसरायमध्ये हा प्रकार समोर आला. या प्रकरणी माहेरकडील लोकांनी हुंड्यासाठी पिंकी देवीची हत्या केली गेली असल्याचा आरोप केला आहे. तर इतर लोकांचं म्हणणं आहे की, महिलेचा पती दीपक शाह याचे दुसऱ्या महिलेसोबत अवैध संबंध होते, ज्याला पिंकी देवीने विरोध केला होता.

पॉलिथिनमध्ये आढळला महिलेचा कमरेखालचा भाग, कवटी आणि हात; हत्येची आणखी एक हादरवून टाकणारी घटना

याच कारणावरून दीपक शहा आणि त्याच्या कुटुंबीयांनी पिंकी देवीची गळा आवळून हत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. एवढंच नाही तर हत्येनंतर पुरावा लपवण्यासाठी पती आणि सासरच्या मंडळींकडून मृतदेह जाळण्याचा प्रयत्नही करण्यात आला. मात्र लगेचच हा प्रकार माहेरकडील लोकांच्या लक्षात आल्याने त्यांनी पोलिसांच्या मदतीने मृतदेह ताब्यात घेतला. ही घटना बखरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बागरस येथील आहे.

सिंगौल पोलीस स्टेशन हद्दीतील रतौली येथील रहिवासी असलेल्या पिंकी देवीचं लग्न 2022 मध्ये बाखरी पोलीस स्टेशन परिसरातील बगरस येथील दीपकसोबत झालं होतं. लग्न झाल्यापासून सासरचे लोक आणि दीपक शहा सतत सोन्याची अंगठी आणि दुचाकीची मागणी करत होते, असा आरोप माहेरकडील लोकांनी केला आहे. मात्र माहेरकडील लोकांनी यासाठी नकार दिल्याने पिंकी देवी हिचा सतत छळ करण्यात येत होता. यातच काल रात्री दीपक शहा याने आधी पत्नी पिंकी देवीचा दारूच्या नशेत गळा आवळून खून केला. यानंतर मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला, मात्र शेजाऱ्यांनी पिंकीच्या माहेरकडील लोकांना याची माहिती दिली.

त्यानंतर माहेरच्या लोकांनी या घटनेची माहिती बखरी पोलीस ठाण्याच्या पोलिसांना दिली. त्यानंतर बाखरी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी मृत पिंकी देवीची सासू आणि नणंद यांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. तर, पती घटनास्थळावरून फरार झाला आहे.

First published:

Tags: Crime news, Murder news