मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

4 महिन्यांच्या मुलीला पायाखाली चिरडलं; तर पदराने गळा आवळून पत्नीचा खून, प्रेमविवाहानंतर तरुणाचं धक्कादायक कृत्य

4 महिन्यांच्या मुलीला पायाखाली चिरडलं; तर पदराने गळा आवळून पत्नीचा खून, प्रेमविवाहानंतर तरुणाचं धक्कादायक कृत्य

दिवशी तरुणाने आपल्या 4 महिन्यांच्या मुलीची पायाखाली चिरडून हत्या केली आणि पत्नीचा गळा आवळून खून करून मृतदेह विहिरीत टाकला. (Man Killed Wife and Daughter)

दिवशी तरुणाने आपल्या 4 महिन्यांच्या मुलीची पायाखाली चिरडून हत्या केली आणि पत्नीचा गळा आवळून खून करून मृतदेह विहिरीत टाकला. (Man Killed Wife and Daughter)

दिवशी तरुणाने आपल्या 4 महिन्यांच्या मुलीची पायाखाली चिरडून हत्या केली आणि पत्नीचा गळा आवळून खून करून मृतदेह विहिरीत टाकला. (Man Killed Wife and Daughter)

    रांची 08 ऑगस्ट : एक अतिशय खळबळजनक घटना नुकतीच समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका तरुणाने प्रेयसीसोबत आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. यानंतर तिला एक मुलगीही झाली. दरम्यान, तरुणाच्या कुटुंबीयांनी त्याचं लग्न दुसऱ्या ठिकाणी ठरवलं, तेव्हा तो तरुण पत्नी आणि मुलीपासून दूर राहू लागला. एके दिवशी तरुणाने आपल्या 4 महिन्यांच्या मुलीची पायाखाली चिरडून हत्या केली आणि पत्नीचा गळा आवळून खून करून मृतदेह विहिरीत टाकला. ही घटना झारखंडच्या गढवा जिल्ह्यात घडली. प्रदीर्घ तपासानंतर या हत्येच्या घटनेनंतर तब्बल दोन महिन्यांनी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी झारखंडमधील गढवा जिल्ह्यातील धुरकी पोलीस स्टेशन हद्दीतील तातीदिरी गावातील विहिरीतून एका महिलेचा मृतदेह पोलिसांनी बाहेर काढला होता. यासोबतच एका नवजात मुलीचा मृतदेहही झुडपात सापडला. त्यावेळी लोकांनी मृतदेह ओळखण्यास नकार दिला. पोलिसांनी खूप प्रयत्न करूनही महिलेच्या मृतदेहाची ओळख पटली नाही. तो जोरजोरात ओरडत राहिला; दाढी ठेवली म्हणून मारहाण, आई-मुलाचे अंतर्वस्त्र काढून... अखेर 72 तासांनंतर पोलिसांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता महिलेचं नाव विनिता कुमारी असून ती रांका पोलीस स्टेशन हद्दीतील पाल्हे गावातील रहिवासी आहे, असं समोर आलं. पोलिसांनी विनीताच्या आई आणि वडिलांशी संपर्क साधला असता वास्तव समोर आलं. पोलिस निरीक्षकांनी सांगितलं की, विनिताच्या पालकांनी पोलिसांना सांगितल्याप्रमाणे, त्यांच्या मुलीचा तातीदिरी गावातील रहिवासी अरविंद साव याच्याशी प्रेमसंबंध होते, नंतर त्यांनी आंतरजातीय विवाह केला होता. अरविंद साव याने एका मुलीसोबत आंतरजातीय विवाह केला होता. त्याला चार महिन्यांची मुलगीही होती. अरविंद गावातील समाजाच्या भीतीने माहुलीत राहत होता. आंतरजातीय विवाह केल्यानंतर अरविंद नाराज होता. दरम्यान, अरविंदच्या पालकांनी त्याचं लग्न दुसऱ्या मुलीसोबत ठरवलं. यानंतर अरविंदने विनिताला पत्नी म्हणून स्वीकारण्यास नकार देण्यास सुरुवात केली. 30 मे रोजी विनिताने अरविंदला सांगितलं की तिला त्याच्या घरी राहायचं आहे. दोघांमध्ये वाद सुरू झाला. अरविंदने विनिताला मारहाण केली. विनीताच्या मांडीवरील चार महिन्यांची मुलगी खाली पडली. अरविंदने चिमुरडीच्या मानेवर पाय टाकून तिचा खून केला. त्यामुळे मुलीचा तिथेच मृत्यू झाला. हे पाहून विनीता आरडाओरडा करू लागली आणि त्यानंतर अरविंदने विनीताचा साडीच्या पदराने गळा आवळून खून केला. पोलीस निरीक्षकांनी सांगितलं की, पुरावा लपवण्यासाठी अरविंदने विनिताचा मृतदेह गावातीलच विहिरीत टाकला आणि मुलीचा मृतदेह झाडीत फेकून दिला. आरोपी अरविंदला अटक करण्यात आली असून त्याची रवानगी गढवा कारागृहात करण्यात आली आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Crime news, Murder news

    पुढील बातम्या