मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /क्रुरतेचा कळस! बापानं स्वतःच्याच 2 बाळांची केली निर्घृण हत्या; लग्नाच आमिष देत दोघींसोबत ठेवलेले संबंध

क्रुरतेचा कळस! बापानं स्वतःच्याच 2 बाळांची केली निर्घृण हत्या; लग्नाच आमिष देत दोघींसोबत ठेवलेले संबंध

आरोपी गोव्यामधील एका कन्स्ट्रक्शन साईटवर काम करायचा. तिथे त्यानं दोन महिलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. या दोन्ही महिलादेखील याच कन्स्ट्रक्शन साईटवर काम करायच्या.

नवी दिल्ली 16 ऑगस्ट : गोव्याच्या (Goa) पणजी (Panaji) येथून हत्येची (Murder) एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका व्यक्तीनं आपल्या दोन नवजात बाळांची हत्या (Man Killed Two Newborn Babies) केली आहे. पोलिसांनी (Goa Police) आरोपीला अटक केली आहे. सध्या आरोपीची चौकशी सुरू आहे. नवजात बाळांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. पोलीस तपासात असं समोर आलं आहे, की आरोपी त्रिपाल नाईक ओडिशाच्या (Odisha) कालाहांडी येथील रहिवासी आहे.

टेस्ट ड्राईव्ह घेण्याच्या बहाण्याने पळवली बाईक, एक तास वाट पाहून मालकाची तक्रार

आरोपी गोव्यामधील एका कन्स्ट्रक्शन साईटवर काम करायचा. तिथे त्यानं दोन महिलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. या दोन्ही महिलादेखील याच कन्स्ट्रक्शन साईटवर काम करायच्या. यातील एका महिलेचं वय 30 वर्ष तर दुसरीचं वय 22 वर्ष आहे. आरोपीनं विवाहित असूनही दोन्ही महिलांसमोर प्रेमाचा प्रस्ताव ठेवला. त्यानं दोघींनाही लग्नाचं वचन दिलं.

लुटारू आले होते सोनसाखळी चोरायला, झटापटीत झाला व्यापाऱ्याचा खून

मागील जून महिन्यात त्याच्या पहिल्या प्रेयसीनं एका बाळाला जन्म दिला. या बाळाची हत्या आरोपीनं आपल्या दुसऱ्या प्रेयसीसोबत मिळून केली. यानंतर एका महिन्यानं आरोपीच्या दुसऱ्या प्रेयसीनं बाळाला जन्म दिला. मात्र, आतापर्यंत या दोघांचं लग्न झालेलं नव्हतं. दोघांनाही आपल्या गावी परतायचं होतं. यामुळे बदनामीच्या भितीनं या व्यक्तीनं आणि त्याच्या प्रेयसीनं या बाळालाही मारलं. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं, की आरोपीच्या विरोधात हत्या आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीदरम्यान त्यानं आपला गुन्हा मान्य केला आहे.

First published:
top videos

    Tags: Crime news, Murder news