Home /News /crime /

बहीण डोळ्यासमोर तडफडत होती अन् पाहून हसत होता खुनी भाऊ, धक्कादायक कारण समोर

बहीण डोळ्यासमोर तडफडत होती अन् पाहून हसत होता खुनी भाऊ, धक्कादायक कारण समोर

 राहुल हा पूर्वीपासून सराईत गुन्हेगार होता. राहुल मोहिते आणि चुलत भाऊ यांच्याबरोबर जमिनीवरुन नेहमी वाद करत होता.

राहुल हा पूर्वीपासून सराईत गुन्हेगार होता. राहुल मोहिते आणि चुलत भाऊ यांच्याबरोबर जमिनीवरुन नेहमी वाद करत होता.

जेव्हा मुलगी मरणाच्या दारात होती आणि तडफडत होती, तेव्हा आरोपी तिला म्हणत होता की मी तुला किती वेळा समजावलं. मात्र, तू आमचं ऐकलं नाहीस आणि आमची बदनामी करत राहिली

  लखनऊ 12 सप्टेंबर : बहीण भावाच्या नात्याला काळिमा फासणारी एक घटना उत्तर प्रदेशमधून (Uttar Pradesh Crime) समोर आली आहे. या घटनेत एका भावानंच आपल्या बहिणीच्या डोक्यात गोळी झाडत तिची हत्या (Man Killed Sister) केली. भावाला आपल्या बहिणीच्या प्रेमप्रकरणाबद्दल (Love Affair) माहिती झालं होतं. बदनामीच्या भीतीनं त्यानं हे पाऊल उचललं. गोळी मारल्यानंतर मरणाच्या आधी बहीण तडफडत होती. मात्र, भाऊ तिथेच उभा राहून हसत राहिला. वडील हॉस्पिटलमध्ये दाखल सांगून 9 वर्षांच्या मुलाचं केलं अपहरण, मागितले 40 लाख,पण मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मेरठच्या सरधना येथील आहे. रात्री उशिरा घरात सगळे झोपलेले असताना आरोपी आरिफनं हे कृत्य केलं. त्यानं सांगितलं, की त्यानं याआधीही आपल्या बहिणीला मारण्याचा प्रयत्न केला आहे. जेव्हा मुलगी मरणाच्या दारात होती आणि तडफडत होती, तेव्हा आरोपी तिला म्हणत होता की मी तुला किती वेळा समजावलं. मात्र, तू आमचं ऐकलं नाहीस आणि आमची बदनामी करत राहिली. आरोपीनं म्हटलं, की आमच्या कुटुंबाची तिच्यामुळे भरपूर बदनामी होत होती. मेरठच्या सरधना ठाण्याच्या क्षेत्रातील मोहल्ला इस्लामाबादमध्ये आपल्या मामाकडे राहणाऱ्या सिमरनचं आपल्याच शेजारी राहणाऱ्या एका युवकासोबत अफेअर होतं. या मुलीला आपल्या प्रियकरासोबत लग्न करायचं होतं. मात्र, कुटुंबीयांचा याला विरोध होता. जेव्हा कुटुंबीयांना याबाबत माहिती झाली तेव्हा त्यांनी मुलीवर नजर ठेवण्यास सुरुवात केली आणि तिचं घरातून बाहेर जाणं बंद केलं. मात्र, तरीही ही मुलगी मोबाईलवरुन आपल्या प्रियकरासोबत बोलत असे. हत्येच्या 3 दिवस आधी तिच्या लहान भावानं तिला प्रियकरासोबत पाहिलं होतं. यानंतर त्याला प्रचंड राग आला आणि त्यानं आपल्या बहिणीला मारण्याचा प्लॅन केला. संतापजनक, उल्हासगरमध्ये 14 वर्षीय मुलीला मारहाण करून बलात्कार आरोपीनं जेव्हा बहिणीची हत्या केली तेव्हा ती झोपलेली होती. गोळीचा आवाज आणि सिमरन ओरडल्यानं घरचे जागे झाले. टेबलवर आपल्या मुलीला रक्ताळलेल्या अवस्थेत पाहून सगळेच हैराण झाले. आरिफ शेजारीच उभा होता, त्याच्या हातात पिस्तुल होता अन् तो हसत होता. घटनेची माहिती मिळताच रात्री दीड वाजता पोलीस याठिकाणी पोहोचले आणि मुलीला रुग्णालयात दाखल केलं. पोलिसांनी बहिणीच्या हत्येप्रकरणी आरिफला अटक केली.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Crime news, Murder news

  पुढील बातम्या