• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • वर्षभर घरातच लपवून ठेवला मृतदेह; मुलानं मृत आईचा वापर करत कमावले 44 लाख रुपये

वर्षभर घरातच लपवून ठेवला मृतदेह; मुलानं मृत आईचा वापर करत कमावले 44 लाख रुपये

एका व्यक्तीनं आपल्या आईचा मृतदेह एका वर्षापर्यंत घरातच लपवून ठेवला (Man Hid Mother’s Body to Draw Pension) होता. या व्यक्तीच्या आईचा मृत्यू मागील वर्षीच झाला होता

 • Share this:
  नवी दिल्ली 11 सप्टेंबर : आजकाल लोक पैशासाठी काहीही करायला तयार असतात. पैशासाठी लोक आपल्या माणसांचाही विचार करत नाहीत. आता तर लोक मृतदेहांचा वापर करूनही पैसे कमवत आहेत. सध्या ऑस्ट्रियामधून असंच एक भयंकर प्रकरण (Shocking News) समोर आलं आहे. यात एका व्यक्तीनं आपल्या आईचा मृतदेह एका वर्षापर्यंत घरातच लपवून ठेवला (Man Hid Mother’s Body to Draw Pension) होता. या व्यक्तीच्या आईचा मृत्यू मागील वर्षीच झाला होता, मात्र ही बातमी बाहेरच्यांना कळू नये, अशी या व्यक्तीची इच्छा होती. याचं कारण होतं महिलेला मिळणारं पेन्शन (Pension). 89 वर्षीय या महिलेला ऑस्ट्रिया सरकारकडून पेन्शन मिळतं. त्याला भीती होती, की आईच्या मृत्यूची बातमी बाहेर गेल्यावर त्याला मिळणारे पैसे बंद होतील. याच कारणामुळे त्यानं आपल्या आईचा मृतदेह स्टोअर करून ठेवला आणि मिळणारं पेन्शन आरामात वापरत राहिला. अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची अधिक माहिती देत सांगितलं, की या व्यक्तीनं अतिशय हुशारी करत आपल्या आईचा मृतदेह सडण्यापासून वाचवला होता. हा मृतदेह सडला असता तर त्याच्या वासामुळे मुलाचं पितळ उघडं पडण्याची शक्यता होती. लग्नाला विरोध केल्यानं मुलीच्या आईसोबत अमानुष कृत्य, उसात आढळला मृतदेह पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना इन्सब्रुक परिसरातील एका घरात 89 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला. द मिररनं दिलेल्या वृत्तानुसार, महिलेचा मृत्यू मागील वर्षीच जून महिन्यात झाला होता. जेव्हा मृतदेहाची ऑटोप्सी केली गेली तेव्हा समजलं, की महिलेला तिच्या 66 वर्षीय मुलानंच मारलं होतं. मृतदेह सडू नये यासाठी त्यानं भरपूर प्रयत्न केले होते. या व्यक्तीचं असं म्हणणं होतं, की मृत्यूबद्दल इतरांना माहिती झाल्यास त्याच्या आईला मिळणार पेन्शन बंद झालं असतं. पैशाच्या मोहासाठी त्यानं आईचा मृतदेह घरातच स्टोअर करून ठेवला. 'खाईल तर तुपाशी', वाईन शॉप फोडायचा अन् फक्त ब्रँडेड बाटल्या चोरायचा, पण... सगळ्यात आधी या व्यक्तीनं मृतदेह बर्फात ठेवला जेणेकरून यातून दुर्गंध येणार नाही. यानंतर त्यानं हा मृतदेह बॅण्डेजनं बांधला. यानंतर त्यानं मृतदेह मांजरीच्या खाण्याच्या पिशवीत ठेवला. पोलिसांना हा मृतदेह ताब्यात घेत आरोपीला अटक केली आहे. त्याच्या हत्येचा आणि मृतदेह लपवून फसणूक केल्याचा आरोप आहे. या घटनेचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा एक नवा पोस्टमॅन पेन्शन देण्यासाठी आला. त्यानं महिलेच्याच हातात पेन्शन देण्याचा हट्ट केला मात्र मुलानं नकार दिला. यानतर संशय आल्यानं या व्यक्तीनं पोलिसांना माहिती दिली. तपासात या घटनेचा खुलासा झाला.
  Published by:Kiran Pharate
  First published: