नवी दिल्ली 09 मार्च : साउथ कोरियामध्ये प्राण्यांशी क्रूरतेने वागल्याची एक संतापजनक घटना घडली आहे. या घटनेत 1000 कुत्र्यांना तडफवून मारण्यात आलं आहे. तब्बल हजार कुत्र्यांवरच्या क्रूरतेची घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. एका व्यक्तीने सुमारे 1000 कुत्र्यांना पिंजऱ्यात बंद केलं आणि त्यांना तसंच डांबून ठेवलं. ते कुत्रे भुकेने आणि तहानेने मरण पावले. हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीचं वय सुमारे 60 वर्षं आहे. या संदर्भात 'हिदुस्तान टाइम्स'ने वृत्त दिलं आहे.
आरोपी वृद्धाच्या घरात 1000 हून अधिक कुत्रे मृतावस्थेत आढळले. त्याची या संदर्भात चौकशी केली जात आहे. त्याचं घर दक्षिण कोरियाच्या उत्तर-पश्चिम प्रांतात आहे. हाँगकाँगमधल्या साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, ग्योन्गी प्रांतातल्या यांगप्यॉन्ग इथं आपला कुत्रा शोधत असताना एका स्थानिकाने केलेल्या तक्रारीनंतर हे विचित्र प्रकरण उघडकीस आलं आहे.
शाळेच्या बाथरूममध्ये नेत 7 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, आरोपीचं पीडितेच्या मैत्रिणीसोबतही क्रूर कृत्य
आरोपीने मोकाट कुत्र्यांना एकत्र करून त्यांना उपाशी मारल्याचं म्हटलं जातंय; पण प्राणी हक्क कार्यकर्त्यांनी असा आरोप केला आहे की व्यावसायिकदृष्ट्या फायदा न झाल्याने त्याने कुत्र्यांना मारलं. कारण त्या कुत्र्यांची काळजी घेण्यासाठी त्याला पैसे देण्यात आले होते. अॅनिमल राइट्स ग्रुप केअरच्या एका सदस्याने सांगितलं, की आरोपीला कुत्र्यांचं पालनपोषण करण्यासाठी मालकांनी प्रत्येक कुत्र्यामागे 10,000 वॉन म्हणजेच 7.70 अमेरिकी डॉलर दिले होते. ही रक्कम त्या कुत्र्यांची काळजी घेण्यासाठी दिली होती. पण, या व्यक्तीने 2020पासून या कुत्र्यांना डांबून ठेवलं आणि उपाशी मारलं, असा आरोप त्याने केला.
पिंजऱ्यात मृतावस्थेत पडलेल्या कुत्र्यांचे हेलावून टाकणारे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्या माणसाच्या घराच्या अंगणात पिंजऱ्यात, पोत्यात आणि रबर बॉक्समध्ये मेलेले कुत्रे दिसत आहेत. घटनास्थळी ठिकाणी पोहोचलेल्या केअर ग्रूपच्या सदस्यांनी सांगितलं की कुत्र्यांच्या कुजलेल्या मृतदेहांचा जमिनीवर एक थर तयार झाला होता. त्याच्या वरच्या भागावर आणखी कुत्र्यांचे मृतदेह टाकून थर बनवण्यात आले होते. एकावर एक असे अनेक थर रचले होते. अशा परिस्थितीतूनही चार कुत्रे बचावले आहेत. त्या कुत्र्यांना त्वचेचे आजार झाले आहेत. तसंच ते कुपोषित आहेत. वाचवलेल्या चार कुत्र्यांवर उपचार सुरू असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
दक्षिण कोरियामध्ये अवघ्या एका दशकात प्राण्यांवर अत्याचाराच्या घटनांमध्ये अनेक पटींनी वाढ झाली आहे. SCMP च्या वृत्तात पुढे म्हटलं आहे, की 2010मध्ये अशा गुन्ह्यांची संख्या 69 होती ती 2019मध्ये 914 वर गेली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dog, Shocking news