नांदेड, 30 मे : राज्यात अत्याचाराच्या, अनैतिक संबंधातून (Immoral Relation) हत्या केल्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसत आहे. पती-पत्नीमध्ये (Husband Wife Dispute) झालेल्या वादाचे रुपांतर हत्येत झाल्याचेही तुम्ही वाचले असेल. यातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना नांदेड जिल्ह्यातील मुखेड (Mukhed) तालुक्यात घडली.
काय आहे प्रकरण?
अनैतिक संबंधातून मित्राच्या मदतीनेच महिलेची हत्या (Woman Murder in Immoral Relation) करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी (Police) दोन जणांना अटक केली आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात सावरमाळ (Sawarmal) इथे ही घटना घडली होती. या गावात चार दिवसांपूर्वी एका महिलेची हत्या (Murder) करण्यात आली होती. प्रेमला भेंडेगांवकर, असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. अनैतिक संबंध आणि आर्थिक देवाणघेवाणच्या वादातून ही हत्या केली, अशी कबुली आरोपींनी दिली आहे. शंकर नामदेव खपाटे (वय - 36) श्रीराम उध्दव पिटलेवाड (वय - 31), अशी अटक करण्यात आलेल्या दोघांनी नावे आहेत.
प्रेमला भेंडेगांवकर या 35 वर्षीय महिलेची हत्या चार दिवसांपूर्वी करण्यात आली. सावरमाळ शिवारातील पिंजारी यांच्या शेतातील पत्राच्या शेडसमोर महिलेचे डोके व चेहरा व पाठीवर जबर दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. भर उन्हात चार दिवसाने प्रेत फुगून सडलेल्या अवस्थेत सापडले. त्यानंतर मुक्रमाबाद पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस उपनिरिक्षक गजानन कांगणे यांनी तपासाची चक्रे फिरवली आणि आरोपींना जेरबंद केले. बेटमोगरा येथून गुरुवारी दोन आरोपींना अटक करण्यात आली.
हेही वाचा - फोटो पाहून तरुणाने केलं लग्न; चेहऱ्यावरील ओढणी हटवताच हादरला, नवरीची थेट तुरुंगात रवानगी
महिलेच्या हत्येच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. यानंतर पोलिसांनी तपासाला वेग दिला. यानंतर दोन आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. यानंतर याप्रकरणी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. पोलिसांनी त्यांना खाकीचा हिसका दाखवल्यावर त्यांनी खुनाची कबुली दिली आहे. मृत महिलेसोबत माझे अनैतिक संबंध तर होते. मात्र, आर्थिक देवाघेवाणातून झाले वाद विकोपाला गेल्यामुळे माझ्या मित्राच्या मदतीने सावरमाळ शिवारात दगडाने ठेचून खून केला, अशी कबुली आरोपीने दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Murder, Nanded, Women extramarital affair