Home /News /crime /

VIDEO: प्रेमप्रकरणातून तरुणाची निर्घृण हत्या करत गुप्तांग कापलं; कुटुंबीयांनी प्रेयसीच्या घरासमोरच केले अंत्यसंस्कार

VIDEO: प्रेमप्रकरणातून तरुणाची निर्घृण हत्या करत गुप्तांग कापलं; कुटुंबीयांनी प्रेयसीच्या घरासमोरच केले अंत्यसंस्कार

तरुणाला प्रेम प्रकरणाच्या संशयातून जबर मारहाण करण्यात आली. इतकंच नाही तर त्याच्या शरीराचे नाजूक भागही कापण्यात आले. रात्री उशिरा शहरातील एका रुग्णालयात (Hospital) त्याचा मृत्यू झाला

    पाटणा 25 जुलै : शुक्रवारी संध्याकाळी सौरभ कुमार उर्फ मोनू नावाच्या एका तरुणाला प्रेम प्रकरणाच्या संशयातून जबर मारहाण करण्यात आली. इतकंच नाही तर त्याच्या शरीराचे नाजूक भागही कापण्यात आले. रात्री उशिरा शहरातील एका रुग्णालयात (Hospital) त्याचा मृत्यू झाला. हत्येच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी लोकांनी एकच गोंधळ केला. ही घटना बिहारच्या (Bihar) मुजफ्फरपुरच्या कांटी ठाणा क्षेत्रातील सोनबरसा गावात घडली. सौरभ हा रामपूर साह येथील रहिवासी होता. घटनेनंतर शनिवारी रेपुरा जवळील मुजफ्फरपुर- देवरियाकोठी रोडतब्बल दोन तास बंद ठेवण्यात आला. 4 वर्ष प्रेम अन् अचानक लग्नाला नकार, तरुणीने विष पिऊन संपवले आयुष्य, प्रियकरावर शवविच्छेदनानंतर तरुणाचा मृतदेह (Dead Body) घेऊन कुटुंबीय संबंधित मुलीच्या घरी पोहोचले आणि तिच्या घरासमोरच मुलावर अंत्यसंस्कार केले. गावातील तणावाचं वातावरण पाहता गावाता मोठ्या प्रमाणात पोलीस (Police) बंदोबस्त करण्यात आला. सुरुवातीच्या तपासानंतर पोलिसांनी सांगितलं, की शुक्रवारी मोनी सोनबरसा येथील आपल्या प्रेयसीच्या घरी गेला होता. घराजवळ असलेल्या निर्मनुष्य ठिकाणी दोघांनाही मुलीच्या घरच्यांनी आपत्तीजनक स्थितीमध्ये पाहिलं. यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी मोनूला जबर मारहाण केली. त्याच्या शरीरातील काही नाजूक भागही कापले. शनिवारी मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं. यादरम्यान सोनबरसा येथे जात तरुणाच्या नातेवाईकांनी गोंधळ घातला. पत्नीने चौथ्या मजल्यावरुन पतीला दिला धक्का; मात्र तरुण पोलिसांना म्हणाला... पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपी असलेला मुलीचा बाप सुशांत पांडे याला अटक केली आहे. याशिवाय इतरही काहींना अटक करण्यात आली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी सांगितलं, की शुक्रवारी संध्याकाळी आरोपींनी सौरभला सोनबरसा इथे बोलावलं. यानंतर त्याला बांधून ठेवत रॉड आणि विटेनं मारहाण करत जखमी केलं. घटनेत सौरभ बेशुद्ध झाल्यानंतर आरोपी त्याला खासगी रुग्णालयात दाखल करून फरार झाले. सौरभच्या वडिलांनी सांगितलं, की आरोपींना याआधीही एका वर्षापूर्वी त्यांच्या मुलाला मारहाण केली होती. सौरभच्या हत्येनंतर त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Crime, Love, Murder

    पुढील बातम्या