Home /News /crime /

Shocking! आईची हत्या करून मृतदेह बेडरूममध्ये केला दफन, 2 वर्षांपासून दररोज लावतो अगरबत्ती

Shocking! आईची हत्या करून मृतदेह बेडरूममध्ये केला दफन, 2 वर्षांपासून दररोज लावतो अगरबत्ती

अखेर आरोपीच्या पत्नीमुळे या मर्डर मिस्ट्रीचा खुलासा झाला आहे.

    कलकत्ता, 15 सप्टेंबर : पश्चिम बंगालमधून (West Bengal) एक खळबळजनक वृत्त समोर आलं आहे. ही बातमी वाचून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. बर्दवान जिल्ह्यात एका 35 वर्षीय व्यक्तीने आपल्या आईची हत्या (Killed mother) केली. इतकच नाही तर त्याने आईची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह दोन वर्षांपर्यंत बेडरूममध्ये दफन केला. (man killed his mother then body was buried in the bedroom) हल्ला केल्यानंतर गळा दाबला या प्रकरणात आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे. या भयावह मर्डर मिस्ट्रीचा खुलासा आरोपीच्या पत्नीने केला. मंगळवारी तिने पोलिसांना याबाबत सांगितल्यानंतर हे सर्व प्रकरण समोर आलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 58 वर्षीय सुकरान बीबी आपला धाकटा मुलगा सहिदुल शेख याच्यासोबत राहत होती. 10 जानेवारी 2019 मध्ये त्याने आपल्या आईची हत्या केली. कारण तिला सहलीसाठी जायचं होतं. शेखने तिच्या डोक्यावर टोकदार शस्त्राने हल्ला केला आणि तिचा गळा आवळला. बेडरूममध्ये मृतदेह केला दफन एका वरिष्ठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येच्या वेळी तेथे कोणीचं नव्हतं. यामुळे त्याने बेडरूमची जमिन खोदली आणि मृतदेह तेथेच दफन केला. तेव्हापासून तो दररोज त्या ठिकाणी अगरबत्ती लावत होता. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सुकरान बेपत्ता झाल्याबद्दल कोणाला काहीच माहिती नव्हतं. मात्र पीडितेचा मुलगा किस्मत अली याने पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली होती. मात्र तिच्याबद्दल फारशी माहिती मिळाली नाही. हे ही वाचा-पेट्रोल ओतून पतीला पेटवलं; मग दगडानं ठेचून हत्या, सांगितलं धक्कादायक कारण दरम्यान एका गोष्टीवरुन आरोपी आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद झाला होता. यानंतर पत्नी घर सोडून माहेरी निघून गेली. यानंतर आरोपी पत्नीला भेटायला तिच्या माहेरी गेला व येथे त्याने पत्नीला सर्व हकीकत सांगितली. यानंतर पत्नीने याबाबत पोलिसांना माहिती दिली. घटनेच्या सहा महिन्यानंतर आरोपीच्या पत्नीने पोलिसांना सांगितलं की, तिचा पती शारिरीक अत्याचार करतो. तो म्हणायचा की, मी आईची हत्या करून तिला बेडरूममध्ये दफन केलं आहे, तुलाही करेन. शेवटी घाबरून पत्नी माहेरी निघून आली होती. पोलिसांना याघटनेबाबत कळताच त्याने शेख याला अटक केलं. बेडरूमममध्ये खोदकाम केल्यानंतर तेथे माणसाची हाडं मिळाली. सध्या हा सांगाडा फॉरेन्सिक तपासासाठी पाठविण्यात आला आहे. शेजारील लोक पीडित बेपत्ता असल्याचं समजत होते, मात्र त्यांना खरी बाब समजल्यानंतर धक्काच बसला.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime, Murder, West bengal

    पुढील बातम्या