Home /News /crime /

मित्रासोबत पत्नीला त्या अवस्थेत पाहून भडकला पती; दोघांनाही दिला भयानक मृत्यू, जाणूनच उडेल थरकाप

मित्रासोबत पत्नीला त्या अवस्थेत पाहून भडकला पती; दोघांनाही दिला भयानक मृत्यू, जाणूनच उडेल थरकाप

सेलाकुई येथील रहिवासी असलेला अरमान डिसेंबर 2021मध्ये बेपत्ता झाला होता. काही दिवसांनी रायवाला पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या पुलाखाली त्याचा मृतदेह आढळून आला.

नवी दिल्ली 28 मे : 'राग हा माणसाचा शत्रू आहे,' अशी शिकवण शाळेत असताना मिळालेली असते. रागात (Anger) असलेली व्यक्ती कुठल्याही गोष्टीवर सर्वसमावेशक विचार करू शकत नाही. त्यामुळे रागाच्या भरात तिच्याकडून चुकीचे निर्णय (Wrong Decision) घेतले जाण्याची शक्यता सर्वांत जास्त असते. काही वेळा तर रागाच्या भरात त्या व्यक्तीच्या हातून एखादा गुन्हादेखील (Crime) घडून जातो. उत्तर प्रदेशातल्या लखीमपूर खेरी (Lakhimpur) इथला रहिवासी असलेल्या मुनशीर अली नावाच्या व्यक्तीबाबत नेमकं हेच घडलं. आपला मित्र (Friend) आणि पत्नीचे (Wife) अनैतिक संबंध (Illicit Relation) असल्याच्या संशयावरून त्याने दोघांचाही खून (Double Murder) केला. इतकंच नाही, तर त्याने पत्नीच्या खुनाचा व्हिडिओदेखील रेकॉर्ड (Murder Video Recording) केला. 'अमर उजाला'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. एका खोलीत तडजोडीची चर्चा, दुसऱ्या खोलीत बलात्कार पीडितेनं उचललं धक्कादायक पाऊल मिळालेल्या माहितीनुसार, सेलाकुई येथील रहिवासी असलेला अरमान डिसेंबर 2021मध्ये बेपत्ता झाला होता. काही दिवसांनी रायवाला पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या पुलाखाली त्याचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी लखीमपूर खेरी येथील रहिवासी मुनशीर अली याला अटक केली. अरमान आणि आपली पत्नी बबिता बानो यांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय मुनशीर अली याला होता. त्याने त्या दोघांना एकत्र पाहिलं होतं. त्यामुळे रागाच्या भरात त्याने अरमानचा खून करून मृतदेह रायवाला परिसरात फेकून दिला होता. पोलीस तपासामध्ये ही बाब उघड झाल्यानंतर त्याला अटक करून तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. इतकंच नाही, 20 नोव्हेंबर 2021 रोजी त्याने पत्नी बबिता बानोचीही हत्या (Wife Murder) करून तिचा मृतदेह फेकला होता, असं पुढील तपासात निष्पन्न झालं आहे. तिचा मृतदेह सहारणपूरच्या गागलहेडी भागात फेकून दिला होता. दरम्यान, गागलहेडी येथील बुधाखेडा अहिर गावात पोलीस शोधत असलेल्या महिलेचा मृतदेह (Dead Body) पडून असल्याची माहिती मिळाली. 22 नोव्हेंबर 2021 रोजी गावप्रमुखाच्या तक्रारीवरून गागलहेडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही महिला मुनशीरची पत्नी बबिता बानोच असल्याचं तपासात आता समोर आलं आहे, असं एसपी (सिटी) सरिता डोवाल यांनी सांगितलं आहे. एकतर्फी प्रेमातून 6 मुलांच्या आईवर भररस्त्यात चाकूनं वार, हल्ल्याचा थरार कॅमेऱ्यात कैद पत्नीची हत्या करताना मुनशीरने मोबाइलवर त्या कृत्याचा व्हिडिओही बनवला होता. त्याचा मोबाइलही पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपीच्या म्हणण्यानुसार, त्याने खून करण्यापूर्वी आपल्या पत्नीला जेवणातून अमली पदार्थ दिला. त्यानंतर तिचा गळा दाबून खून केला व मृतदेह गाडीत टाकून कालियार पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या कालव्याच्या काठावरच्या झुडपात तो फेकून दिला; मात्र पोलिसांना बबिता बानोचा मृतदेह सहारणपूर जिल्ह्यात सापडला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. सध्या आरोपी मुनशीर आपल्या एका मैत्रिणीसह न्यायालयीन कोठडीत आहे.
First published:

Tags: Crime news, Murder news

पुढील बातम्या