मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

शेतकऱ्याला गाडीखाली चिरडून मारलं; बुलडाण्यातून हादरवणारी घटना, कारण समोर

शेतकऱ्याला गाडीखाली चिरडून मारलं; बुलडाण्यातून हादरवणारी घटना, कारण समोर

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

ट्रक शेतातून नेण्यास मनाई केल्याने शेतकऱ्याला चिरडल्याची घटना समोर आली आहे. ही घटना देऊळगावराजा तालुक्यातील सुलतानपुरमधून समोर आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Buldana, India
  • Published by:  Kiran Pharate

राहुल खंदारे, बुलडाणा 07 डिसेंबर : बुलडाण्यातून एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. यात अवैध रेतीचा ट्रक शेतातून नेण्यास मनाई केल्याने शेतकऱ्यासोबत जे काही घडलं ते थरकाप उडवणारं आहे. ट्रक शेतातून नेण्यास मनाई केल्याने शेतकऱ्याला चिरडल्याची घटना समोर आली आहे. ही घटना देऊळगावराजा तालुक्यातील सुलतानपुरमधून समोर आली आहे.

पनवेल: सोनाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून पळवले दागिने; या कारणामुळे काहीच वेळात चोराने स्वतःच परत केले

ट्रक शेतातून नेण्यास मनाई केल्याचा राग मनात धरून शेतकऱ्याचा बोलेरो गाडीने चिरडून खून केल्याचा धक्कादायक प्रकार देऊळगाव राजा तालुक्यातील सुलतानपूर येथे घडला आहे.. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांत तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेजराव डोईफोडे (वय 60 वर्ष) असं मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे.. ही घटना रात्री घडली असून याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

देऊळगाव राजा तालुक्यातील सुलतानपूर येथील मृतक शेतकरी तेजराव डोईफोडे आणि त्यांच्या मुलाने शेतातून अवैध रेतीचा ट्रक नेण्यास मनाई केली होती.. याचाच राग आल्याने रंगनाथ डोईफोडे तसे़ंच त्यांच्या दोन मुलांनी तेजराव डोईफोडे आणि त्यांच्या मुलाला लोखंडी टॉमीने, काठीने मारहाण केली. हा वाद एवढ्यावरट थांबला नाही.

एकाच मुलीची दोघांशी ओळख, प्रेमाचा त्रिकोण अनं नागपुरात तरुणावर जीवघेणा हल्ला

आरोपींनी तेजराव डोईफोडे यांच्या घराबाहेर येऊन त्यांना शिवीगाळही केली. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर आरोपींनी त्यांच्याजवळ असलेल्या बोलेरो गाडीने तेजराव डोईफोडे यांना चिरडलं. यात तेजराव डोईफोडे यांचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तिघा बापलेकांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

First published:

Tags: Crime news, Shocking news