मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

युवकानं मुस्लीम कुटुंबाला ट्रकखाली चिरडलं; चौघांचा मृत्यू, धक्कादायक कारण आलं समोर

युवकानं मुस्लीम कुटुंबाला ट्रकखाली चिरडलं; चौघांचा मृत्यू, धक्कादायक कारण आलं समोर

एका मुस्लीम कुटुंबाला (Muslim Family) हेट क्राईमचा सामना करावा लागला आहे. रविवारी घडलेल्या या घटनेत कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाला आहे.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 08 जून: कॅनडामध्ये (Canada) एका मुस्लीम कुटुंबाला (Muslim Family) हेट क्राईमचा सामना करावा लागला आहे. रविवारी घडलेल्या या घटनेत कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाला आहे. तर, एक नऊ वर्षाचा मुलगा रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांचं असं म्हणणं आहे, की आरोपी युवकाला मुस्लिमांचा राग येतो. याच कारणामुले त्यानं हे पाऊल उचललं आहे.

रविवारी या आरोपीनं मुद्दाम या मुस्लीम कुटुंबावर आपला पिकअप ट्रक चढवला आणि चिरडून त्यांची हत्या केली. यात 74 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर, 46 वर्षीय पुरुष, 44 वर्षीय महिला आणि 15 वर्षीय चिमुकलीनं रुग्णालयात घेऊन जात असताना रस्त्यातच जीव सोडला. कुटुंबातील नऊ वर्षीय चिमुकल्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात भर्ती करण्यात आलं असून त्याची प्रकृती सध्या गंभीर आहे.

वीज कडाडल्याने चुकला काळजाचा ठोका; औरंगाबादमध्ये चिमुकलीचा दुर्दैवी अंत

पोलिसांनी 20 वर्षीय संशयित आरोपी नथानिएल वेल्टमॅन (Nathaniel Veltman) याला रविवारी अटक केली आहे. तो मुळचा लंडनचा रहिवासी आहे. पोलिसांनी हा हेट क्राइम असल्याचं म्हणत आरोपीला मुस्लीम लोक आवडत नसल्याचं सांगितलं आहे. याच कारणामुळे त्यानं हा गुन्हा केला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

स्टार्टर सुरू करताच मोटारीने घेतला पेट; सांगलीत भाजीविक्रेत्याचा होरपळून मृत्यू

ही घटना 2017 नंतरची मुस्लिमांविरोधात झालेला सर्वात मोठा हल्ला असल्याचं म्हटलं जात आहे. 2017 मध्ये क्यूबेक सिटीच्या मस्जिदमधील सहा सदस्यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. लंडनचे पोलीस प्रमुख स्टीफन विलियम्स यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, आम्हाला असं वाटतंय, की हे मुद्दाम केलं गेलं आहे. मृतांना त्यांच्या धर्मामुळे मारलं गेल्याचं अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

First published:

Tags: Crime news, International, Murder