Home /News /crime /

माणुसकीला काळीमा! साखर झोपेत असलेल्या तरुणाला जिवंत जाळलं

माणुसकीला काळीमा! साखर झोपेत असलेल्या तरुणाला जिवंत जाळलं

बेघर असलेला तरुण फुटपाथ झोपला होता. त्याचवेली तिथे आलेल्या व्यक्तीनं त्याला केमिकल टाकून जिवंत जाळलं.

    साओ पाउलो, 7 जानेवारी: भररस्त्यात झोपलेल्या माणसाला जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार ब्राझीलमध्ये समोर आला आहे. तरुण रस्त्यावर शांतपणे झोपला होता. त्यावेळी एका विकृत व्यक्तीनं त्याच्यावर ज्वलनशील पदार्थ टाकला आणि जाळलं. घटनेमध्ये 39 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र 70 टक्क्यांहून अधिक भाजल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी विकृत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. 'Daily Mail'ने दिलेल्या वृत्तानुसार मृत्युमुखी झालेल्या तरुणाचं नाव कार्लोस रॉबर्टो असल्याची माहिती मिळत आहे. त्याला स्वत:चं घर नाही. त्यामुळे छोटीमोठी कामं करून तो रस्त्यावरच आपली गुजराण करत होता. फुटपाथवर झोपून रात्र काढत होता. वाचा-'कॉल गर्ल'साठी फोन करणं पडलं महागात, बायकोचाच फोटो SEX वर्करच्या पेशात व्हायरल दरम्यान विकृत अज्ञात व्यक्तीनं या तरुणाला जाळल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री घडली. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. कार्लोस रॉबर्टो साखर झोपेत असताना त्याला कसं जिवंत जाळलं ते. रॉबर्टो फुटपाथवर शांत झोपला होता. त्याचवेळी या अज्ञात व्यक्तीनं त्याच्य़ा आजूबाजूला पेट घेणारं लिक्विड टाकलं आणि आग लावली. आगीचा भडका उडताच अज्ञात व्यक्ती फरार झाला. मात्र त्याचा कारनामा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कार्लोसला जाळण्यासाठी केरोसीन किंवा पेट्रोलचा वापर करण्यात आला असावा. 70 टक्क्यांहून अधिक भाजल्यानं त्याचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळावरून खाण्यापिण्याचं कोणतंही सामान आढळलं नाही. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार कार्लोस लोकांची छोटी-मोठी कामं करून द्यायचा आणि त्याबदल्यात खायला मागाय़चा. त्यानंतर रात्री फुटपाथवर झोपायचा. त्याची हत्या करण्यामागचं कारण अद्याप समोर येऊ शकलं नाही. पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू आहे. हेही वाचा-लेकीचं प्रेम आई-वडिलांना पाहावलं नाही, प्रियकराला विष पाजून संपवल्याचा आरोप
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Crime

    पुढील बातम्या