Home /News /crime /

तीन महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावून तरुणीवर केला बलात्कार

तीन महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावून तरुणीवर केला बलात्कार

हा नराधम इथवरच थांबला नाही तर त्याने तरुणीचे नग्न अवस्थेतील फोटो काढले.

    भोपाळ, 17 जानेवारी: देशात महिला अत्याचाराच्या घटना थांबायचं नाव घेईनात. दिवसेंदिवस महिलाविरोधी अत्याचाराच्या घटना वाढतच चालल्या आहे. अशीच एक घटना समोर आली आहे. एका युवकानं वाढदिवसाचं निमित्त सांगून गर्लफ्रेन्डला घरी बोलवलं आणि तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला आहे. आरोपी नराधम एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने या खाजगी प्रसंगाचे फोटोही काढले आहे. त्यानंतर हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून पीडित मुलीवर वारंवार बलात्कार केला आहे. या प्रकरणातील आरोपीचं नाव राम श्याम गुर्जर असं असून तो रायसेन जिल्ह्यातील रहिवाशी आहे. तर पीडित युवती विदिशा जिल्ह्यातील रहिवाशी आहे. लॉकडाऊनच्या काळात दोघंही आपापल्या गावातून भोपाळला आले होते. त्यानंतर त्या दोघांनी एकत्र एका दुकानात काम केलं. यातुनच दोघांची ओळख झाली होती. कालांतराने या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं, अशी माहिती एएसपी राजेश सिंह भदौरिया यांनी दिली आहे. वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावून केला बलात्कार त्यानंतरच्या या दोघांच्या मैत्रीचं नातं आणखी फुलतच गेलं. त्यानंतर आरोपी राम श्याम गुर्जर या पीडित मुलीला दुचाकीवरून दररोज तिच्या घरी सोडायला जात असे. हाच त्यांचा दिनक्रम तब्बल 3 महिने चालू राहिला. त्यानंतर एके दिवशी आरोपीने वाढदिवसाच्या बहाण्याने पीडित युवतीला खोलीत बोलावलं, अशी माहिती पीडित युवतीने पोलिसांना दिली. तिने पुढं सांगितलं की, जेव्हा ती तिथे पोहचली तेव्हा त्याचा वाढदिवसच नव्हता. आरोपीने या संधीचा फायदा घेत तिच्यावर जोर जबरदस्ती करू लागला. त्यानंतर बलाचा वापर करून त्याने तिच्या इच्छेविरुद्ध शरीरसंबंध स्थापित केला. इतकंच नाही तर आरोपींने पीडित युवतीची काही फोटोही काढले. त्यानंतर हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून आरोपीने तिच्यावर आणखी तीन ते चार वेळा बलात्कार केला. सध्या आरोपी राम श्याम गुर्जर फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. लवकरच आरोपीला अटक केली जाईल, असं आश्वासनही पोलिसांनी दिलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Madhya pradesh, Rape

    पुढील बातम्या