Home /News /crime /

कानपूरच्या घरात शिरले चोर, अमेरिकेहून आला फोन; मध्यरात्री गोळीबार

कानपूरच्या घरात शिरले चोर, अमेरिकेहून आला फोन; मध्यरात्री गोळीबार

अमेरिकेत बसलेल्या एका व्यक्तीने आपल्या कानपूरच्या घरी चोर शिरल्याचं सीसीटीव्हीत पाहिलं आणि पोलिसांना फोन लावला. त्यानंतर जे घडलं ते विशेष होतं..

    कानपूर, 18 जानेवारी: मध्यरात्री (Midnight) आपल्या घरात चोर शिरल्याचं (Theeves) घरमालकाला (House owner) मोबाईलवरील (Mobile) सीसीटीव्ही (CCTV) दिसलं. त्याने तातडीनं पोलिसांना फोन (Call to police) लावला आणि या घटनेची कल्पना दिली. घरातून दीर्घकाळ बाहेर राहावं लागणारे घरमालक सध्या सीसीटीव्हीचा वापर करतात. त्यामुळे जगाच्या पाठीवर कुठेही असलं, तरी मोबाईलवरून आपल्या घरात काय चाललंय, याची कल्पना येऊ शकते.  घरात शिरले चोर कानपूरमधील रहिवासी विजय अवस्थी हे काही कामानिमित्त अमेरिकेला गेले होते. जाण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या घरात सीसीटीव्ही लावले होते. आपल्या घरात काय सुरू आहे, हे ते वारंवार मोबाईलवरून तपासत असत. घटनेच्या दिवशी मध्यरात्रीच्या सुमाराला काही चोर त्यांच्या घरात शिरले. त्यावेळी अमेरिकेत दुपार असल्यामुळे विजय अवस्थी हे मोबाईलवर आपल्या घरी काय चाललंय, ते पाहत होते. त्यावेळी काही चोरटे घरात घुसल्याचं त्यांना दिसतं. त्यांनी तातडीनं कानपूर पोलिसांना फोन केला आणि घटनेची कल्पना दिली.  पोलिसांनी घेरले चोरांना घटनेची कल्पना मिळताच पोलिसांनी विजय अवस्थी यांच्या घराकडे धाव घेतली आणि घराला वेढा घातला. चोरांना बाहेर येण्याची सूचना केली आणि त्यांच्या अटकेची तयारीही केली. मात्र चोरांनी पोलिसांना शरण न जाता पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यातील एक चोरटा पोलिसांच्या समोर आल्यानंतर त्याने स्वतःकडच्या बंदुकीतून गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पोलिसांनीही गोळीबार केला. या गोळीबारात एक गोळी चोरट्याच्या पायाला लागली आणि तो जखमी झाला. पोलिसांनी चोरट्यांना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.  हे वाचा - सीसीटीव्हीमुळे पकडली चोरी सीसीटीव्ही हा सध्या सुरक्षेतील मोठा घटक ठरत आहे. अनेक चोऱ्यांची उकल करण्यात तर सीसीटीव्हीचा उपयोग होतोच, मात्र अनेक चोऱ्या थांबवण्यातही त्याचा उपयोग झाल्याचं यापूर्वी वारंवार दिसून आलं आहे. कानपूरमध्ये घडलेल्या या घटनेतूनही हेच दिसून आलं आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
    Published by:desk news
    First published:

    Tags: America, Cctv, Crime, Kanpur, Police, Theft

    पुढील बातम्या