नवी दिल्ली 14 ऑगस्ट : तेलंगणा राज्यातल्या वारंगळ जिल्ह्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या आजोबांचा मृतदेह चक्क फ्रीजमध्ये लपवून (Telangana man hides grandfather’s body in fridge) ठेवला होता. चार दिवस त्याने हा मृतदेह लपवून ठेवला होता. अखेर, घरमालकाने घरातून येणाऱ्या दुर्गंधीबाबत चौकशी केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, या व्यक्तीने असं का केलं हे माहिती झाल्यानंतर पोलिसही हैराण झाले होते.
मुळचे कामारेड्डी जिल्ह्यातले ब्यारम बलैया (90) हे आपल्या 22 वर्षांच्या नातवासोबत वारंगळमधल्या पार्कल भागात राहत होते. दहा वर्षांपूर्वीच ते या ठिकाणी राहायला आले होते. बलैया हे एक निवृत्त शिक्षक (retired teacher’s body hidden for pension) होते. दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या पत्नीचं कोरोनामुळे निधन झालं होतं. त्यांच्या मुलाचाही 2019मध्येच अपघातात मृत्यू झाला होता. तसंच, काही वर्षांपूर्वीच त्यांच्या सुनेचाही मृत्यू झाला होता. त्यामुळे आता केवळ ते आणि त्यांचा नातू निखिल (22) हे दोघेच घरी असायचे. घर चालवण्यासाठी बलैया यांचं पेन्शन हा एकमेव स्रोत होता.
सिगरेट आणायला उशीर झाल्यानं मित्राला दगडानं ठेचलं, मृतदेहाचे तुकडे केले अन्...
काही दिवसांपूर्वी बलैया यांचाही मृत्यू झाला. निखिलने आजोबांचा मृत्यू झाल्याचं कोणालाही सांगितलं नाही. उलट त्याने आपल्या आजोबांचा मृतदेह चक्क फ्रीजमध्ये (man hide body of grandfather) लपवून ठेवला. तीन-चार दिवसांनंतर हा मृतदेह कुजून त्याची दुर्गंधी सगळीकडे पसरू लागली. याबाबत शेजारी राहणाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर घरमालकाने येऊन चौकशी केली; मात्र निखिलचं वागणं संशयास्पद असल्यामुळे पोलिसांना बोलावण्यात आलं.
पोलिसांना पाहून निखिल रडायला लागला. आजोबांचा मृतदेह फ्रीजमध्ये (grandfather body in fridge) लपवल्याचं त्याने पोलिसांसमोर कबूल केलं. अंत्यविधी करण्यासाठी आपल्याकडे पैसेच नाहीत, त्यामुळे (no money for last rituals) आपण हे कृत्य केल्याचं निखिलने पोलिसांना सांगितलं. यासोबतच, आजोबांचा मृत्यू झालाय हे समजलं, तर त्यांच्या नावाने बँकेत जमा होणारं पेन्शन बंद होईल, या भीतीनेही निखिलने हे कृत्य केल्याचं बोललं जात आहे.
प्रेमविवाहाला पाठिंबा दिल्याची दोघा भावांना मिळाली अजब शिक्षा; 34 लाखाचा दंड
प्राथमिक तपासात बलैया यांचा मृत्यू वृद्धापकाळामुळे झाल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे निखिलवर कोणती कारवाई करावी याबाबत पोलीस निर्णय घेत आहेत. तसंच, या प्रकरणाचा आणखी तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Murder news