राम मंदिरासाठी निधी गोळा करत असल्याचा बनाव, भामट्याविरोधात गुन्हा दाखल

अयोध्येत बनणाऱ्या राम मंदिरासाठी (Ram Mandir in Ayodhya) पैसे गोळा करत असल्याचं सांगून लोकांकडून पैसे लुबाडण्याविरोधात भोपाळमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अयोध्येत बनणाऱ्या राम मंदिरासाठी (Ram Mandir in Ayodhya) पैसे गोळा करत असल्याचं सांगून लोकांकडून पैसे लुबाडण्याविरोधात भोपाळमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Share this:
    भोपाळ, 03 फेब्रुवारी: निर्माणाधीन असणाऱ्या अयोध्येतील राम मंदिरासाठी (Ram Mandir in Ayodhya) देशभरातून वर्गणी गोळा केली जात आहे. हे देणगी अभियान देशभरात राबवले जात असतानाच काही धक्कादायक घडामोडी देखील समोर येत आहेत. मध्य प्रदेशमधून देखील अशीच एक बातमी समोर येते आहे. याठिकाणी पोलिसांनी एका 30 वर्षीय व्यक्तीवर भोपाळमध्ये गुन्हा दाखल केला आहे. लोकांना फसवून या कामाकरता निधी गोळा करण्याऱ्या या भामट्याविरोधात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याबाबत माहिती दिली असून मनीष राजपूत (Manish Rajput) असं या तरुणाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार मनीष राजपूत विरोधात भादवी कलम 420 (फसवणूक) आणि 120 बी (गुन्हेगारी कट रचल्याची शिक्षा) या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोपाळचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक (एएसपी) राजेश भदोरिया यांनी ही माहिती दिली. हा आरोपी अशोका गार्डन परिसरातील रहिवासी आहे. हिंदूस्तान टाइम्सने याबाबत वृत्त दिले आहे. (हे वाचा-मोठी बातमी! Jeff Bezos यांचा Amazonच्या सीईओ पदावरून राजीनामा) विश्व हिंदू परिषदेच्या एका अधिकाऱ्याने याबाबत तक्रार दाखल केली होती, त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आल्याची माहिती एएसपींनी दिली. यतेंद्र पाल सिंह हे याठिकाणचे विहिंपचे स्थानिक नेते आहेत, त्यांनी दोन दिवसांपूर्वी ही तक्रार दाखल केली होती. राम जन्मभूमि संकल्प सोसायटी (Ram JanmaBhoomi Sankalp Society) या नावाने खाजगी कंपनीत काम करणारा राजपूत बनावट फंड चालवत असल्याची तक्रार यतेंद्र यांनी केली होती. एएसपींनी दिलेल्या माहितीनुसार तो अशोका गार्डन परिसरात गेल्या काही दिवसांपासून फंड गोळा करत होता. (हे वाचा-धक्कादायक! 8 महिन्याच्या चिमुरडीसह महिलेनं दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी) यतेंद्र सिंह यांनी तक्रारीमध्ये असं म्हटलं आहे की ही व्यक्ती जमा केलेल्या या देणगीचा वापर वैयक्तिक कामासाठी करत आहे. पोलिसांनी याप्रकरणी चौकशी केल्यानंतर त्यांना असे आढळून आले की राजपूत एक बनावट संस्था चालवत असून त्याद्वारे तो राम मंदिराच्या नावाखाली लोकांकडून पैसे लुटत आहे. मीडिया अहवालात असे म्हटले आहे की- इर्शाद वाली, डीआजी, यांनी दिलेल्या माहितीनुसार या फसवणुकीमध्ये राजपूत व्यतिरिक्त आणखी कुणाचा समावेश आहे का याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: