Home /News /crime /

धक्कादायक! हरवलेल्या मुलाचा सांगाडा गच्चीत सापडला, बायको करत होती सोबत असल्याचा दावा

धक्कादायक! हरवलेल्या मुलाचा सांगाडा गच्चीत सापडला, बायको करत होती सोबत असल्याचा दावा

पश्चिम बंगालमधल्या सॉल्ट लेक शहरातील अनिल कुमार महेनसरिया यांनी आपला 25 वर्षांचा मुलगा अर्जुन बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. पोलीस तपासात अनिल यांच्या घराच्या गच्चीत एक हाडांचा सांगाडा सापडला आहे.

सॉल्ट लेक, 11 डिसेंबर : पश्चिम बंगालमधल्या सॉल्ट लेक शहरातील अनिल कुमार महेनसरिया यांनी आपला 25 वर्षांचा मुलगा अर्जुन बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. पोलीस तपासात अनिल यांच्या घराच्या गच्चीत एक हाडांचा सांगाडा सापडला आहे. प्राथमिक तपासात तो सांगाडा त्यांच्या मुलाचाच असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अनिल हे सॉल्ट लेकमधील उच्चभ्रु परिसरात राहतात. त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्यांची बायको गीता हिने एक वर्षापूर्वी आपल्या तीन मुलांसोबत अनिल यांचं घर सोडलं होतं. सुरुवातीला ती राजारहाट परिसरात अर्जुन (25), विदुर (22) आणि वैदेही (20) यांच्यसोबत राहत होती. त्यांची बायको तिन्ही मुलांना घेऊन तिच्या माहेरी रांचीला रहायला गेल्याचं अनिल यांना या वर्षी ऑक्टोबर महिन्यात कळालं. अनिल यांचं त्यांचा मुलगा अर्जुनशी बोलणं होत नव्हतं तरीही त्यांची बायको त्यांना तो तिच्याबरोबर असल्याचं सांगत होती, असं त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत म्हटलं आहे. मुलगा हरवल्याचा संशय आल्याने अनिल यांनी बिधाननगर पूर्व पोलीस स्टेशनमध्ये गुरुवारी सकाळी तक्रार दाखल केली. त्यांचा मुलगा अर्जुन बेपत्ता होण्यामागे त्यांची पत्नी गीता यांचा हात आहे, असा त्यांना संशय होता. तिनेच त्याचं अपहरण किंवा खून केला, अशी भीतीही अनिल यांनी व्यक्त केल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. पोलीस अधिकारी म्हणाले, 'त्यांच्या तक्रारीनुसार आम्ही तपास सुरू केला आणि अनिल यांच्या एजे ब्लॉकमधील घराच्या गच्चीतच आम्हाला एक सापळा आढळला. मृताची ओळख पटवण्यासाठी सापळा वैद्यकीय तपासणीसाठी पाठवला आहे. पण अनिल यांनी केलेल्या अर्जुनच्या वर्णानावरून तो सापळा अर्जुनचाच असल्याचा अंदाज आहे. आम्ही प्रकरणाचा तपास करत आहोत आणि वैद्यकीय चाचणीचे रिपोर्ट आल्यावर अधिक स्पष्टता येईल'. पोलीस पुढील तपास करत आहेत. सध्या गुन्हे करण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. टीव्हीवरील क्राइमसंबंधीच्या मालिका त्याला खतपाणी घालतात.
First published:

पुढील बातम्या