मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /उस्मानाबादेत चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची अग्निपरीक्षा, उकळत्या तेलातून काढायला लावलं नाणं

उस्मानाबादेत चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची अग्निपरीक्षा, उकळत्या तेलातून काढायला लावलं नाणं

चारित्र्याच्या संशयावरुन एका व्यक्तीनं आपल्या पत्नीला अग्निपरीक्षा देण्यास भाग पाडलं आहे. नवऱ्याच्या या संतापजनक कृत्याचा व्हिडीओ (Video Viral) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला होता.

उस्मानाबाद 22 फेब्रुवारी : चारित्र्याच्या संशयावरुन एका व्यक्तीनं आपल्या पत्नीला अग्निपरीक्षा देण्यास भाग पाडलं आहे. या व्यक्तीनं आपल्या पत्नीला उकळत्या तेलात हात घालून पाच रुपयांचं नाणं काढयला लावलं आहे. आपल्याच पत्नीसोबत केलेल्या या अमानुष कृत्याचा त्यानं स्वतःच व्हिडीओदेखील बनवला आहे. ही घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा या गावची आहे. नवऱ्याच्या या संतापजनक कृत्याचा व्हिडीओ (Video Viral) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला होता. मात्र, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे स्पष्ट होत नव्हतं. अशात आता न्यूज 18 लोकमतनं याचा पाठपुरावा करत याबद्दलची माहिती मिळवली आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मोठे वादंगदेखील माजले होते. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबद्दलचा प्रश्न अनेकजण उपस्थित करत असतानाच आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पाच दिवस अत्याचार सहन केल्यानंतर बदनामीच्या भितीनं अग्निपरीक्षा दिल्याचा खळबळजनक खुलासा या महिलेनं न्यूज 18 लोकमतशी बोलताना केला आहे. सोबतच या गोष्टीची माहिती कोणाला दिल्यास जिवंत जाळून मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही महिलेनं केला आहे. यामुळे समोर काहीही पर्याय न उरल्यानं महिलेंनही उकळत्या तेलात हात घालत नाणं काढलं.

तर, बायकोनं दिलेली अग्निपरीक्षा जगासमोर आणण्यासाठी हा व्हिडिओ बनवला असल्याचा खुलासा महिलेच्या पतीनं केला आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलीस ठाण्यात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. या संतपाजनक कृत्यानंतर पीडित महिलेला योग्य तो न्याय मिळावा अशी मागणी पारधी संघटनेनं केली आहे. अन्यथा पारधी समाज राज्यभर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशाराही पारधी संघटनेनं दिला आहे.

First published:

Tags: Crime news, Viral video.