Home /News /crime /

फेसबुक पोस्टवरच्या कमेंटमुळे घडला धक्कादायक प्रकार, गोळीबारात 4 जण गंभीर जखमी

फेसबुक पोस्टवरच्या कमेंटमुळे घडला धक्कादायक प्रकार, गोळीबारात 4 जण गंभीर जखमी

फेसबुकच्या पोस्टवर कमेंट करणं महागात पडलं आहे. या कमेंटवरून झालेला वाद गुंडगिरीपर्यंत पोहोचला आणि घात झाला.

    नवी दिल्ली, 06 नोव्हेंबर : फेसबुकच्या पोस्टवर कमेंट करणं महागात पडलं आहे. या कमेंटवरून झालेला वाद गुंडगिरीपर्यंत पोहोचला आणि घात झाला. दोन अल्पवयीन मुलं आणि त्यांच्या वडिलांसह चार जणांवर गोळ्या झाडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी रात्री दिल्लीच्या नांगलोई भागात एका फेसबुक पोस्टवर कमेंट केल्यामुळे दोन अल्पवयीन आणि त्यांच्या वडिलांसह चौघांना गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेत चारही जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना दिल्लीतील नांगलोई भागात घडली आहे. फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट केली आणि त्यातून हा वाद उफाळून आला. या वादातून कमेंट करणाऱ्या व्यक्तीला तरुणानं कानशिलात लगावली होती. पीडितने आपल्या मित्राला वाचवण्यासाठी मध्यस्ती केली. या परिसरातून रात्री उशिरा एक फोन आला आणि गोळीबार सुरू असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळावर पोलीस दाखल होईपर्यंत आरोपी फरार झाला होता. पोलिसांनी जखमी चार जणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. एका अल्पवयीन मुलाला सफदरजंग रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. हे वाचा-6 वर्षीय मुलाला जन्मदात्यानेच दिल्या मरणयातना, कारण ऐकून बसेल धक्का पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पीडितेचा अल्पवयीन मुलगा मित्रासह मोमोज खायला गेला होता. दरम्यान, या मित्राने फेसबुकवर कमेंट्स दिलेल्या आरोपीच्या प्रोफाईलवर पोस्ट केली. यानंतर आरोपी पीडित मित्रासह तेथे असलेल्या दुकानात पोहोचला. त्यानंतर आरोपीने पीडितेच्या मित्राला कानशिलात मारली आणि पीडितेने त्याला वाचवण्यासाठी हस्तक्षेप केला, यामुळे आरोपी संतापला. पोलिसांनी सांगितले की, आरोपी बाईकवरून आला आणि त्याने गोळीबार केला आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Crime news, Delhi

    पुढील बातम्या