मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /भावाच्या लग्नात डान्स करून लागली भूक, असं काही केलं की पोहोचला तुरुंगात

भावाच्या लग्नात डान्स करून लागली भूक, असं काही केलं की पोहोचला तुरुंगात

भावाच्या लग्नात डान्स करून करून भूक लागल्यानंतर जेवण न मिळाल्यामुळे (Man fires gun for not getting food at party arrested by police) गोळीबार करणारा तरुण थेट तुरुंगात पोहोचला.

भावाच्या लग्नात डान्स करून करून भूक लागल्यानंतर जेवण न मिळाल्यामुळे (Man fires gun for not getting food at party arrested by police) गोळीबार करणारा तरुण थेट तुरुंगात पोहोचला.

भावाच्या लग्नात डान्स करून करून भूक लागल्यानंतर जेवण न मिळाल्यामुळे (Man fires gun for not getting food at party arrested by police) गोळीबार करणारा तरुण थेट तुरुंगात पोहोचला.

नवी दिल्ली, 1 डिसेंबर: भावाच्या लग्नात डान्स करून करून भूक लागल्यानंतर जेवण न मिळाल्यामुळे (Man fires gun for not getting food at party arrested by police) गोळीबार करणारा तरुण थेट तुरुंगात पोहोचला. आपल्या भावाच्या लग्नाचं सेलिब्रेशन करण्यासाठी हा तरुण फार्म हाऊसवर आयोजित एका कार्यक्रमात आला होता. या कार्यक्रमात डान्स करण्याच्या (Hungry in the midnight after liquor and dance) नादात जेवणाची वेळ उलटून गेल्याचं त्याच्या लक्षात आलं नाही. मात्र जेव्हा भूकेची जाणीव झाली, तेव्हा अन्न मिळत नसल्यामुळे व्याकूळ झालेल्या तरुणाने थेट खिशातून पिस्तुल काढलं.

अशी घडली घटना

नवी दिल्ली परिसरातील एका फार्महाऊसवर लग्नाची पार्टी आयोजित करण्यात आली होती. आपल्या चुलत भावाच्या लग्नासाठी मनिष नावाचा तरुण तिथं हजर होता. इतर सर्व नातेवाईकांसोबत तो संध्याकाळपासूनच डान्स करत होता. जेवणाची वेळ टळून गेल्याचं त्याच्या लक्षातही आलं नाही. दारुच्या नशेत धुंद असल्यामुळे त्याने मध्यरात्रीपर्यंत डान्स केला. इतर नातेवाईकांनी जेवणाच्या वेळेत जेवण केल्यामुळे ते काही वेळाने डान्स करून झोपून गेले. मात्र दारु आणि डान्सच्या धुंदीत वेळेत जेवण करण्याचं भान मनिषला उरलं नाही.

मध्यरात्री लागली भूक

मध्यरात्री पावणेतीन वाजता मनिषला भूकेची जाणीव झाली. मात्र तोपर्यंत फार्म हाऊसचं किचन बंद झालं होतं. त्यानं तिथं उपस्थित असणाऱ्या वेटरकडे जेवणाची मागणी केली. मात्र वेटरने किचन बंद झाल्याचं लागत जेवण मिळू शकत नसल्याचं सांगितलं. त्यावर संतापलेल्या मनिषनं बंदूक काढत वेटरवर ती उगारली आणि हवेत गोळीबार केला.

हे वाचा - कुटुंबीयांकडून तरुणीची हत्या, जळत्या चितेवरून पोलिसांनी उचलला मृतदेह

पोलिसांना कल्पना

या घटनेनंतर वेटर तिथून कसाबसा पळाला आणि धडपडत मॅनेजरकडे पोहोचला. मॅनेजर आणि इतर स्टाफने मनिषला आवरलं आणि पोलिसांना याची सूचना दिली. काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मनिषला ताब्यात घेतलं. त्याच्याकडून अवैध बंदूक आणि दोन काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. मनिषला पोलिसांनी अटक केली असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Crime, Delhi, Gun firing