लखनऊ, 16 एप्रिल : उत्तर प्रदेशातील कासगंज इथं एक धक्कादायक घटना घडली आहे. कासगंजमधील होडलपूर इथं एका 65 वर्षीय महिलेचा खून करण्यात आला. गावातीलच एका दिव्यांग तरुणाने हा खून केला असून पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ गुरुवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, होडलपुर इथल्या श्यामवती नावाच्या 65 वर्षीय महिलेचा खून झाला. गावातीलच दिव्यांग तरुण मोनू याने देशी कट्ट्याने गोळी झाडून महिलेची हत्या केली. लोकांच्या डोळ्यासमोर ही घटना घडत हल्लेखोराला रोखण्याऐवजी त्याचा व्हिडिओ करण्यात लोक गुंग झाले होते.
हल्लेखोराने पहिल्यांदा झाडलेली गोळी महिलेच्या कमरेला लागल्यानंतर ती खाली कोसळली. यावेळी छतावर उभा असलेल्या शेजाऱ्यांनी व्हिडिओ शूट केला. कोणीही पुढे येऊन त्याला रोखण्याचा प्रयत्न केला नाही किंवा पोलिसांनाही कल्पना दिली नाही. एका गोळीने महिलेचा मृत्यू झाला नाही म्हणून त्याने पुन्हा कट्ट्यात गोळी भरली आणि ती झाडली.
हे वाचा : मृत कोरोनाबाधिताची ट्रॅव्हल हिस्ट्री लपवली? काँग्रेस माजी जिल्हाध्यक्षाचा आरोप
डोक्यात गोळी मारल्यानंतर हल्लेखोर आरामात तिथून निघून जातो. घटनेनंतर जिल्ह्यातील अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा करून संशयित आरोपीला ताब्यात घेतलं आहे. चौकशीनंतर असं समोर आलं की, संशयित आरोपी मोनू महिलेचं घर हडपण्याचा प्रयत्न करत होता. त्याच वादातून मोनूने महिलेवर हल्ला केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हे वाचा : भाजप नगरसेवकाला 'ओली पार्टी' भोवणार, अपात्रतेच्या कारवाईचे आयुक्तांना निर्देश
संपादन - सूरज यादव
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Uttar pradesh