Home /News /crime /

पत्नी जेवणात मिसळून द्यायची मासिक पाळीतील रक्त; पतीनं सांगितलं अघोरी कृत्यामागील धक्कादायक कारण

पत्नी जेवणात मिसळून द्यायची मासिक पाळीतील रक्त; पतीनं सांगितलं अघोरी कृत्यामागील धक्कादायक कारण

एका महिलेनं आपलं मासिक पाळीतील रक्त जेवणात मिसळून पतीला ते जेवण खाण्यासाठी दिलं (Woman Mixed Period Blood Into Partners' Food). यामुळे पतीला गंभीर इन्फेक्शन (Infection) झालं.

    नवी दिल्ली 01 डिसेंबर : नुकतीच एक अतिशय धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) गाझियाबादमधून समोर आली आहे. असा आरोप आहे की एका महिलेनं आपलं मासिक पाळीतील रक्त जेवणात मिसळून पतीला ते जेवण खाण्यासाठी दिलं (Woman Mixed Period Blood Into Partners' Food). यामुळे पतीला गंभीर इन्फेक्शन (Infection) झालं. या व्यक्तीने मागील वर्षी 12 जूनला पत्नी आणि तिच्या आई - वडिलांविरोधात कवीनगर ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रार आल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र लिहून याप्रकरणी अहवाल मागवला होता. आता या आरोपांच्या चौकशीसाठी चार सदस्यीय वैद्यकीय पथक स्थापन करण्यात आले आहे. या बोर्डाच्या अहवालानंतर गाझियाबाद पोलीस पुढील कारवाई ठरवतील. एफआयआरमध्ये आपल्या दाव्यांची पुष्टी देण्यासाठी त्या व्यक्तीने वैद्यकीय अहवालही सादर केला आहे. पीडित व्यक्तीच्या तक्रारीवरून, कवी नगर पोलीस ठाण्यात पत्नी आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध आयपीसी कलम ३२८ आणि १२०बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न खाल्ल्यानंतर आजारी पडल्यावर आपण वैद्यकीय चाचणी केली, असा दावा तक्रारकर्त्याने केला आहे. तपासणीत त्याच्या शरीरात संसर्ग झाल्यामुळे सूज असल्याची पुष्टी झाली. पीडित व्यक्तीचं लग्न 2015 साली झालं होतं. या दाम्प्त्याला एक मुलगाही आहे. तक्रारीत म्हटल्यानुसार, पत्नी वारंवार सासू-सासऱ्यांपासून वेगळं राहाण्याचा हट्ट करत असे. मात्र तिचा पती आपल्या आई-वडिलांना सोडून जाण्यास तयार नव्हता. याच कारणावरुन त्यांचा अनेकदा वाद होत असे. पीडित व्यक्तीचा असा आरोप आहे की महिलेला तिच्या आई-वडिलांनी आणि भावानं त्याला जेवणातून विष देण्यासाठी आणि वेगवेगळ्या प्रकारचा जादू-टोना करण्यास सांगितलं. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Periods, Shocking news

    पुढील बातम्या