नागपूर, 30 नोव्हेंबर : देशाची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये (Nagpur) गुन्हेगारीच्या घटनांनी डोके वर काढले आहे. आता तर एका गुंडाच्या साथीदाराने वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला (traffic police nagpur) कारच्या बोनेटवरून फरफटत नेल्याची धक्कादायक घटनासमोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
नागपूर सक्करदरा चौकातील 29 नोव्हेंबर रोजीची ही घटना आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. आकाश चव्हाण असे कार चालकाचे नाव आहे. त्याने वाहतूक पोलीस कर्मचारी अमोल चिदमवर यांना कारने चिरडण्याचा प्रयत्न केला. कारचालक आकाश हा एका गुंडाचा साथीदार आहे.
#नागपूर -वाहतूक पोलिसाला नेले कारच्या बोनेट वरून फरफटत, नागपुर सक्करदरा चौकातील सिनेस्टाईल थरार
कार न थांबविता वाहतूक पोलिसाला तब्बल पाचशे मीटर अंतरापर्यंत बोनेटवरून फरफटत नेले pic.twitter.com/mJMFyLbCWf — sachin salve (@SachinSalve7) November 30, 2020
सक्करदरा चौकात कर्तव्यावर असताना अमोल चिदमवर यांनी आकाशला कार थांबवण्याचा इशारा केला होता. कारला पूर्णपणे काळ्या काचा लावण्यात होत्या. अमोल चिदमवर यांनी कार थांबवण्यास सांगितले असता आकाश याने त्यांना जुमानले नाही आणि कार तशीच सुसाट पळवली. अमोल चिदमवर यांनी पुन्हा एकदा त्याला हटकले असता त्याने त्यांच्या अंगावरच कार चढवून चिरडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे प्रसंगवधान राखत अमोल यांनी कारच्या बोनेटवर उडी घेतली.
आरोपी आकाशने कार न थांबविता वाहतूक पोलिसाला तब्बल पाचशे मीटर अंतरापर्यंत बोनेटवरून फरफटत नेले. याच दरम्यान, चौकात दोन दुचाकीनाही त्याने धडक दिली. यात एक महिला किरकोळ जखमी झाली आहे.
अखेर, चौकात वाहतूक कोंडी झाल्यामुळे आरोपी आकाशला कार थांबवावी लागली. त्यानंतर आरोपी आकाशला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरोधात सक्करदरा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कर्मचाऱ्याला जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.