मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /Video : दिल्लीत पुन्हा कंझावाला सारखी घटना; हॉर्न वाजवण्यावरुन तरुणाला अर्धा किमी फरफटत नेलं

Video : दिल्लीत पुन्हा कंझावाला सारखी घटना; हॉर्न वाजवण्यावरुन तरुणाला अर्धा किमी फरफटत नेलं

दिल्लीत पुन्हा कंझावाला सारखी घटना

दिल्लीत पुन्हा कंझावाला सारखी घटना

Man Dragged in Delhi Rajouri Garden: पश्चिम दिल्लीच्या राजौरी गार्डन परिसरात हॉर्न वाजवण्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणानंतर एका कारवाल्या वेड्या तरुणाने मध्यस्थीसाठी आलेल्या व्यक्तीला गाडीच्या बोनेटवर 500 मीटरपर्यंत ओढत नेले.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

नवी दिल्ली, 14 जानेवारी : देशाच्या राजधानीत कंझावला घटनेसारखे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. हा प्रकार घडवून आणणाऱ्या आरोपींनी वादानंतर एका तरुणाला गाडीपासून काही अंतरावर ओढून नेले. पश्चिम दिल्लीच्या राजौरी गार्डन परिसरात हॉर्न वाजवण्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणानंतर एका कारवाल्या तरुणाने मध्यस्थीसाठी आलेल्या व्यक्तीला गाडीच्या बोनेटवर 500 मीटरपर्यंत ओढत नेले. काही लोकांनी कारस्वाराचा पाठलाग केला असता कारचे ब्रेक लावून कारच्या बोनेटला लटकलेल्या व्यक्तीला खाली टाकून कारस्वार फरार झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी राजा गार्डन रिंगरोडची आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रॉपर्टी डीलिंगचे काम करणारा जयप्रकाश हा त्याचा मित्र हरविंदर कोहली याला भेटण्यासाठी रोहिणीहून राजा गार्डन चौकाकडे येत होता. त्यांच्या गाडीसमोर एक तरुण बसला होता. जयप्रकाश यांनी हॉर्न वाजवून बाजू मागितली, बाजू न दिल्याने ते दुसऱ्या टोकाकडून गाडी काढून पुढे निघून गेले. यामुळे संतापलेल्या तरुणाने पुढे येऊन जयप्रकाश यांच्या गाडीसमोर आपली कार उभी केली. आधी त्यांच्याशी वाद झाला, त्यानंतर त्यांनी जयप्रकाश यांच्यावर हात उगारला, इतक्यात तेथे काही लोक जमा झाले.

वाचा - वृद्धाचा मेहुण्याच्या पाच वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; एक फोन कॉल अन्..

गर्दी पाहून हरविंदर कोहली जवळ पोहोचला तेव्हा त्याला दिसले की, कार चालवणारा एक तरुण त्याच्या मित्राशी भांडत होता. त्याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न सुरू केल्यावर तरुणानेही त्याच्यावर हात उचलला. काही वेळाने प्रकरण थांबले. दरम्यान, कारमधील तरुणाने प्रथम हरविंदर कोहलीला धडक देण्याचा प्रयत्न केला. पण सुदैवाने त्याने गाडीचा वायपर पकडला आणि बॉनेटला लटकला. मात्र गाडी थांबवण्याऐवजी त्या तरुणाने सुमारे 500 मीटरपर्यंत कार पळवली.

ही घटना जवळच असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. यादरम्यान घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही दुचाकीस्वार व कारस्वारांनी कारला ओव्हरटेक केले, त्यानंतर स्वत:ला अडकल्याचे पाहून कारमधील तरुणाने ब्रेक लावला. त्यामुळे हरविंदर कोहली खाली पडला आणि कारस्वार तेथून फरार झाला.

या घटनेबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी माहिती देताना डीसीपी पश्चिम घनश्याम बन्सल म्हणाले की, याप्रकरणी 279/323/341/308 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीची ओळख पटली असून पोलीस पुढील कारवाई करत असल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे, पीडित हरविंदर कोहलीने सांगितले की, “मला कारस्वाराने बोनेटवर 400-500 मीटरपर्यंत ओढले, वादात मी मध्यस्थीसाठी गेलो. गाडीत बसलेल्या तरुणाचे वडील सांगत होते, या चढव सरदारावर गाडी. क्षुल्लक कारणावरुन तुम्ही जीवे मारणार का?"

First published:

Tags: Accident, Delhi