मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

Amazon नं Deliver केलेलं विष खाऊन तरुणाचा मृत्यू, हताश वडिलांनी मांडली कैफियत

Amazon नं Deliver केलेलं विष खाऊन तरुणाचा मृत्यू, हताश वडिलांनी मांडली कैफियत

अमेझॉनवरून ऑर्डर (Man dies after consuming poison delivered from Amazon) केलेलं विष घेतल्याने आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याची फिर्याद त्याच्या वडिलांनी  जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

  • Published by:  desk news

इंदूर, 23 नोव्हेंबर: अमेझॉनवरून ऑर्डर (Man dies after consuming poison delivered from Amazon) केलेलं विष घेतल्याने आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याची फिर्याद त्याच्या वडिलांनी  जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यामुळे अमेझॉनच्या (Complaint to district collector) कारभाराबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. यापूर्वी मारिज्युआना म्हणजेच गांजाची ऑनलाईन विक्री केल्याचं प्रकरण ताजं असतानाच अमेझॉनच्या बाबतीतला हा (Serious question regarding working style of Amazon) आणखी एक प्रकार समोर आला आहे. अमेझॉनवर नियम मोडून व्यापार केल्याप्रकरणी कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मृत तरुणाच्या वडिलांनी केली आहे.

काय आहे प्रकरण?

इंदूरमध्ये राहणाऱ्या रंजित वर्मा यांचा मुलगा आदित्यचा 29 जुलै या दिवश विष घेतल्यामुळे मृत्यू झाला होता. त्याने हे विष अमेझॉनवरून ऑर्डर केल्याचं तपासातून दिसून आलं होतं. अमेझॉनवरून आपल्या मुलानं काही गोष्टी ऑर्डर केल्या होत्या. त्यात सेल्फोस नावाचा विषारी पदार्थदेखील होता. तो खाल्ल्यामुळे आदित्यचा मृत्यू झाल्याचं त्याच्या पोस्टमॉर्टेममधून सिद्ध झालं होतं.

वडिलांना बसला धक्का

इंदूरमध्ये फळांच्या खरेदी आणि विक्रीचा व्यवसाय करणारे आदित्य वर्मा गेल्या काही महिन्यांपासून अस्वस्थ आहेत. आपल्या मुलाच्या अकाली निधनामागचं कारण शोधण्याचा ते प्रयत्न करत आहेत. हाताशी आलेला मुलगा असा अचानक निघून गेल्यामुळे बसलेला धक्का पचवण्याचा प्रयत्न करता करता ते या घटनांमागच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मुलाच्या आत्महत्येमागचं कारण अद्याप स्पष्टपणे समोर आलं नसलं तरी त्यानं अमेझॉनवरून विष मागवल्याचं स्पष्ट झालं आहे.

हे वाचा- विद्यार्थिनीने फोन आपटत शिक्षिकेलाच मारली चापट; संतापजनक घटनेचा VIDEO आला समोर

कारवाईची मागणी

अमेझॉननं विषाची मागणी पूर्ण केली नसती, तर कदाचित आपल्या मुलाचा जीव वाचला असता, असं वर्मा यांचं मत आहे. जिल्हाधिकाऱ्यांसमोर त्यांनी आपली फिर्याद दिली असून कंपनीवर कारवाई करण्यासाठी पावलं उचलण्याची मागणी केली आहे.

First published:

Tags: Amazon, Death, Suicide