Home /News /crime /

Tiger Attack : आई अन् पत्नीच्या डोळ्यादेखत वाघाने फरफटत नेलं; चंद्रपुरातील हृदय पिळवटणारी घटना

Tiger Attack : आई अन् पत्नीच्या डोळ्यादेखत वाघाने फरफटत नेलं; चंद्रपुरातील हृदय पिळवटणारी घटना

राजेंद्र अर्जुन कमादी, असे मृताचे नाव आहे. मृत व्यक्ती ब्रह्मपुरी तालुक्याच्या हल्दी गावातील रहिवासी होता.

    चंद्रपूर, 13 जून : चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आईच्या डोळ्यासमोरच तिच्या पोटच्या मुलाचा मृत्यू (Son death in front of Mother) झाला आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. काय आहे घटना - चंद्रपूर जिल्हा परिसरातील जंगलात वाघ पाहायला मिळतात. याच वाघामुळे एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. ही घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपुरी तालुक्यात रविवारी दुपारच्या सुमारास घडली. वाघाने केलेल्या हल्ल्यात एका 50 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली. राजेंद्र अर्जुन कमादी, असे मृताचे नाव आहे. मृत व्यक्ती ब्रह्मपुरी तालुक्याच्या हल्दी गावातील रहिवासी होता. तसेच तो मजुरी काम करत होता. ब्रह्मपुरीच्या वनविभागच्या वरिष्ठ अधिकारी यांनी सांगितले की, मृत व्यक्ती घराभोवती कुंपण करण्यासाठी लाकूड गोळा करण्यासाठी आपल्या आई आणि पत्नीसह जवळच्या जंगलात गेला होता. त्यानंतर झुडपात लपलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. आई आणि पत्नीने आरडाओरड केल्यानंतर वाघाने घटनास्थळावरून पळ काढला. हेही वाचा - 5 तोळ्यांच्या दागिन्यांसह नणंदेला घेऊन पळाली नवरी; जाताना सासू-सासऱ्यांची केली अशी अवस्था घटनेची माहिती मिळताच, स्थानिक रहिवासी आणि वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर आजूबाजूच्या गावांमध्ये भयाचे वातावरण आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये मध्येही आक्रोश आहे. स्थानिक नेत्याने म्हटले की, अशा प्रकारच्या हल्ले होऊ नये, यासाठी प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्रशासनाने प्रयत्न केले नाही तर स्थानिक जनना विरोध प्रदर्शन करेल.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Chandrapur, Death, Tiger attack

    पुढील बातम्या