मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

24 वेळा पाहिला अनुष्काचा हॉरर सिनेमा; चित्रपटातील तो सीन पाहून स्वतःलाच पेटवून घेतलं, तरुणाचा मृत्यू

24 वेळा पाहिला अनुष्काचा हॉरर सिनेमा; चित्रपटातील तो सीन पाहून स्वतःलाच पेटवून घेतलं, तरुणाचा मृत्यू

या तरुणाने स्वतःवरच 20 लिटर पेट्रोल ओतून घेतलं आणि स्वतःलाच पेटवलं. या घटनेत तो गंभीररित्या भाजला. गंभीर अवस्थेच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्याचा मृत्यू झाला.

    बंगळुरू 13 ऑगस्ट : आपण अनेकदा ऐकलं असेल की चित्रपटांचा आपल्या आयुष्यावर नकळतपणे बराच परिणाम होतो. चित्रपटांमधील अनेक गोष्टींचं अनुसरण करण्याचा प्रयत्न आपण करत असतो. मात्र, कधीकधी ही छोटी गोष्ट अतिशय घातकही ठरू शकते. याचाच प्रत्यय देणारी एक घटना कर्नाटकमधून समोर आली आहे. या घटनेत तुमकरू जिल्ह्यातील एका तरुणाने अरुंधती हा तेलुगू हॉरर सिनेमा पाहून आपला जीव दिला आहे. पत्नी माहेराहून येत नसल्याने विकासने ओलांडली मर्यादा, आधी काकीला खोलीत घेऊन गेला अन्...दोघेही रुग्णालयात! या तरुणाने स्वतःवरच 20 लिटर पेट्रोल ओतून घेतलं आणि स्वतःलाच पेटवलं. या घटनेत तो गंभीररित्या भाजला. गंभीर अवस्थेच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्याचा मृत्यू झाला. एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, या युवकाने स्वतःला पेटवून घेण्याआधी एक व्हिडिओही शूट केला. यामध्ये त्याने आपल्या वडिलांनी सांगितलं की असं केल्यानं त्याला मुक्ती मिळेल. ही घटना मधुगिरी तालुक्यातील एका गावातली आहे. यात 23 वर्षी रेणुका प्रसादने जवळपास 24 वेळा अरुंधती हा तेलुगू हॉरर सिनेमा पाहिला. तरुणाच्या आई-वडिलांनी सांगितलं की त्यांनी आपल्या मुलाला बऱ्याचदा असं करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने ऐकलं नाही. इतकंच नाही तर त्याने 12 मध्ये असतानाच आपलं शिक्षणही मध्येच सोडून दिलं होतं. राखीपौर्णिमेसाठी माहेरी आली होती तरुणी; पहिल्या प्रियकराने घेतली भेट अन् काही वेळात मृत्यू! मिळालेल्या माहितीनुसार, ज्याप्रकारे चित्रपटातील मुख्य पात्राला आत्मदहन केल्यानंतर मुक्ती मिळाली, त्याचप्रमाणे आपणही असंच केलं तर आपल्याला मुक्ती मिळेल असं रेणुकाला वाटलं. यामुळे त्याने गावाच्या बाहेरील परिसरात जात स्वतःवर २० लिटर पेट्रोल ओतून घेतलं आणि स्वतःला आगीच्या हवाली केलं. पोलिसांनी सांगितलं की जेव्हा रेणुकाने स्वतःला पेटवून घेतलं तेव्हा रस्त्याने जाणाऱ्या काही लोकांनी त्याला पाहिलं. यानंतर त्याला आधी जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, बुधवारी या तरुणाचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी सांगितलं की या आगीमध्ये युवक 60 टक्के भाजला होता आणि त्याची प्रकृती अतिशय नाजूक होती.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Shocking news, South film

    पुढील बातम्या