संबंधित तरुणाचा 8 महिन्यांपूर्वीच नंदिता नावाच्या 20 वर्षीय तरुणीसोबत विवाह झाला होता. मात्र, सासूनं आपल्याच जावयाला मारहाण करत आत्महत्या (Suicide) करण्यास भाग पाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
हैदराबाद 20 फेब्रुवारी : सासू आणि जावयाचं नातं हे आई आणि मुलाप्रमाणं असतं असं म्हटलं जातं. मात्र, आता एका सासूनं आपल्याच जावयाला मारहाण करत आत्महत्या (Suicide) करण्यास भाग पाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सासूच्या विवाहबाह्य संबंधाबद्दल (Extramarital Affair) माहिती झाल्यानं अंगोटू बाबू या 25 वर्षीय तरुणानं तिला या गोष्टीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, असं न झाल्यानं आणि बदनामीची भीती वाटल्यानं तरुणानं आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला. ही घटना तेलंगणातील मीरपेठ येथे घडली आहे.
संबंधित तरुणाचा 8 महिन्यांपूर्वीच नंदिता नावाच्या 20 वर्षीय तरुणीसोबत विवाह (Marriage) झाला होता. अंगोटू नालकोंडा जिल्ह्यातील तुटीपेडा तांडा भागात राहायचा. नंदिताची आई म्हणजेच अंगोटूची सासूदेखील याच भागात राहायची. विजयाचे श्रीणू नावाच्या व्यक्तीसोबत विवाहबाह्य अनैतिक संबंध (Extramarital Affair) होते. या संबंधांबाबत अंगोटूला समजलं. यानंतर त्यानं सासूला जाब विचारत पंचायत बोलवून तिच्या अनैतिक संबंधांबद्दल सांगितलं. याच गोष्टीचा विजयाला राग आला. अंगोटूनं आपला चार लोकांमध्ये अपमान केला हे तिला सहन झालं नाही.
विजयानं आपला प्रियकर श्रीणूसोबत मिळून अंगोटूला बेदम मारहाण केली. इतकंच नाही तर तिनं स्वतःच्याच जावयाला जीवे मारण्याची धमकीही दिली. या सर्व घटनेमुळे बदनामी झाल्यानं आणि मारहाण झाल्यानं संबंधित तरुण नैराश्यात गेला आणि त्यानं आत्महत्येचा पर्याय निवडला. त्यानं राहात्या घरात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. यानंतर अंगोटूचे वडील रामू यांनी विजयाविरोधात पोलिसांत (Police) तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास सध्या पोलीस करत आहेत.
Published by:Kiran Pharate
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.